Tamhini Ghat Accident : ताम्हिणी घाटात भीषण अपघात; 500 फूट दरीत कार कोसळली

Tamhini Ghat Accident
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Tamhini Ghat Accident । पुणे माणगाव मार्गावर असलेल्या ताम्हिणी घाटातुन भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. या घाटात प्रवासादरम्यान, थार कार 500 फूट दरीत कोसळली आहे. खरं तर हा अपघात मंगळवारी उशिरा रात्री घडला. तीन दिवसापूर्वी कारमधील व्यक्तींचा संपर्क तुटला होता. त्यानंतर बचाव पथकाला चार जणांचे मृतदेह सापडले असून दोन जण बेपत्ता आहेत. अवघड वळणावर चालकाचा नियत्रंण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

ताम्हिणी घाट हा पर्यटकांचा केंद्रबिंदू असल्याने सातत्याने याठिकाणी वाहनांची मोठी वर्दळ बघायला मिळते. या घाटातून दररोज हजारो गाड्यांची ये जा पाहायला मिळते. घाटातील वळणे हि धोकादायक असल्याने वाहने सावकाश चालवा असे आवाहन सातत्याने करण्यात येत, कारण यापूर्वी सुद्धा ताम्हिणी घाटाने अनेक अपघात बघितले आहेत. त्यातच आता मंगळवारी या घाटातून प्रवास करताना एक थार ५०० फूट दरीत कोसळली. या भीषण अपघातात ३ लोकांचा प्राण गेला आहे. या अपघाताची वेळ रात्रीची असल्याने कोणालाही अपघाताची (Tamhini Ghat Accident) कल्पना तात्काळ आली नसल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचा तपास पोलीस करत असून बचाव पथकामार्फत बचावकार्य सुरु आहे.

मृतदेहाच्या तपासणीचे काम सुरु- Tamhini Ghat Accident

कार मधील प्रवासी ३ दिवस संपर्कांच्या बाहेर असल्याने त्यांचे घरचे चिंतेत होते. कोणत्याही परिस्थितीत संपर्क होत नसल्याने त्यांच्या नातेवाईकांनी चौकशी सुरू केली. मोबाईलमधील शेवटचे लोकेशन तपासण्यात आले असता ताम्हिणी घाट परिसरातच जीपीएस सिग्नल थांबल्याचे दिसले. यानंतर तातडीने शोधमोहीम सुरू करण्यात आली. सह्याद्री वन्यजीव सामाजिक संस्थेच्या रेस्क्यू टीमकडून आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने मोठ्या प्रमाणात शोधमोहीम हाती घेण्यात आली. अखेर ड्रोन शुटमध्ये दरीत थार जिप आणि मृतदेह आढळले. सध्या या मृतदेहाच्या तपासणीचे काम सुरु आहे.