Tamhini Ghat : ताम्हिणी घाट रस्ता खचला ; ‘या’ तारखेपर्यंत वाहतूक राहणार बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Tamhini Ghat : राज्यभरातल्या जवळपास सर्वच भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पुणे , कोल्हापूर, सांगली सातारा या भागात अद्यापही पावसाचा जोर आहेच. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जर तुम्ही पर्यटनाकरिता किंवा प्रवासासाठी ताम्हिणी घाटाततून जाण्याचा विचार करीत असाल तर थांबा …! कारण ताम्हिणी घाट सध्या बंद करण्यात आला आहे. पुणे जिल्हाधिकारी यांनी याबाबतची माहिती सूचना (Tamhini Ghat) जारी केली आहे.

५ ऑगस्ट पर्यंत वाहतूक बंद (Tamhini Ghat)

रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा ताम्हिणी घाट खचला आहे. त्यामुळे त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले असून हा घाट येत्या ५ ऑगस्ट सकाळी आठ पर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्याच्या सूचना पुणे जिल्ह्याधिकाऱ्यांनी (Tamhini Ghat) दिल्या आहेत.

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वाहतूक बंद (Tamhini Ghat)

मिळालेल्या माहितीनुसार, मागच्या काही दिवसांपासुन पुणे जिल्ह्यात मोठा पाऊस पडत आहे. या पावसामुळे ताम्हिणी घाटात रास्ता एका बाजीने खचला आहे. दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून पुढील काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्यास हा रस्ता आणखी खचून दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा मार्ग बंद ठेवण्याबाबत पुणे जिल्हाधिकारी यांनी वाहतूक (Tamhini Ghat) बंदचे निर्देश दिले आहेत.

शनिवार, रविवार विकेंडला या रस्त्यावर पावसाळी पर्यटनासाठी मोठी गर्दी होते. पावसामुळे या घाटात अनेक धबधबे प्रवाहित होतात याचाच आनंद घेण्यासाठी येथे पर्यटक पावसाळ्यात हजेरी लावतात. मात्र मौजे आदरवाडी व डोंगरवाडी गाव येथील घाट परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्र.753 एफ वरील रस्त्याच्या एका बाजूस अतिवृष्टीमुळे तडा गेल्यामुळे हा रास्ता खचला आहे. त्यामुळे अशा स्थितीत वाहतूक (Tamhini Ghat) केल्यास ती धोकादायक ठरू शकते. त्यामुळे हा रस्ता ५ ऑगस्ट पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.