Tata Ace EV 1000 : Tata Motors ने लाँच केला Electric Truck; 161 KM रेंज, किंमत किती?

Tata Ace EV 1000 launched
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही वर्षात देशात इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी वाढली आहे. पेट्रोल- डिझेलच्या खर्चातून सुटका करून घेण्यासाठी अनेकजण इलेक्ट्रिक गाडी खरेदीला प्राधान्य देत आहेत. आत्तापर्यंत तुम्ही इलेक्ट्रिक बाईक, इलेक्ट्रिक स्कुटर, इलेक्ट्रिक रिक्षा, इलेक्ट्रिक कार बघितली असेल, मात्र आता प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी Tata Motors ने इलेक्ट्रिक ट्रक लाँच केला आहे. Tata Ace EV 1000 असं या इलेक्ट्रिक ट्रकचे नाव असून सिंगल चार्जवर हा ट्र्क 161 किलोमीटर अंतर कापण्यास सक्षम आहे. तसेच तो 1 टन माल सुद्धा उचलू शकतो.

या नवीन इलेक्ट्रिक ट्रकच्या (Tata Ace EV 1000) लौंचिंग वेळी टाटा मोटर्स कमर्शियल व्हेईकलचे SCV आणि PU चे उपाध्यक्ष आणि बिझनेस हेड विनय पाठक यांनी म्हंटल कि, गेल्या दोन वर्षांपासून आमचे Ace EV ग्राहक या ट्रकचा पुरेपूर फायदा घेत आहेत, ज्यामुळे त्यांना नफाही मिळत आहे आणि हा ट्रक टिकाऊही आहे. विनय पाठक पुढे म्हणाले की, हा ट्रक क्रांतिकारी जीरो एमीशन लास्ट-मील मोबिलिटी सॉल्यूशनचा ब्रँड ॲम्बेसेडर बनला आहे.

काय फीचर्स मिळतात? Tata Ace EV 1000

Tata Ace EV 1000 इव्होजेन पॉवरट्रेनसह सुसज्ज आहे, ज्याची बॅटरी सात वर्षांची वॉरंटी देते तसेच पाच वर्षांचे मेन्टेनन्स पॅकेजही दिले जात आहे. टाटाच्या या इलेक्ट्रिक ट्रकमध्ये बसवलेली इलेक्ट्रिक मोटर 27 kW किंवा 36.2 bhp ची पॉवर आणि 130 Nm पीक टॉर्क जनरेट करते. ट्रकमध्ये फास्ट चार्जिंगची सुविधा देण्यात आली असून त्यानुसार अवघ्या 105 मिनिटांत तो फुल्ल चार्ज होतो. एकदा का पूर्णपणे चार्जिंग केल्यास हा इलेक्ट्रिक ट्र्क तब्बल 161 किलोमीटर अंतर आरामात पार करू शकतो . पूर्णपणे लोड केल्यानंतर सुद्धा त्याच्या क्षमेतत कोणताही फरक पडत नाही. सध्या तरी या इलेक्ट्रिक ट्रकचा सामना करेल असा दुसरा ट्रक देशात नाही. कंपनीने Tata Ace EV 1000 ची किंमत 9.21 लाख रुपये ठेवली आहे.