Tata Altroz CNG vs Maruti Baleno CNG; कोणती गाडी Best? पहा Full Comparison

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमुळे अनेकांचा कल हा CNG वाहनांकडे वळत आहे. ग्राहकांची वाढती मागणी पाहता गेल्या वर्षभरात अनेक वाहन उत्पादन कंपन्यांनी आपल्या गाड्या CNG व्हर्जन मध्ये आणल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर टाटा मोटर्स आपली हॅचबॅक कार Altroz ​​CNG व्हर्जन मध्ये लाँच करणार असून भारतीय बाजारात या गाडीचा थेट सामना मारुती सुझुकीच्या Baleno शी होणार आहे. अशावेळी तुम्ही सुद्धा कार खरेदी करणार असाल आणि या दोन्हींमधील कोणती कार घ्यायची याबाबत तुमच्या मनात गोंधळ किंवा संभ्रम असेल तर चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला या दोन्ही CNG मॉडेलचा लूक, इंजिन, किंमत याबाबत सविस्तर तुलना करणार आहोत, त्यानंतर तुम्हीच ठरवा कि कोणती गाडी तुमच्यासाठी बेस्ट ठरेल.

इंजिन –

दोन्ही गाड्यांच्या इंजिनची तुलना करायची झाल्यास, Tata Altroz CNG मध्ये 1.2-लिटर नेचरली एस्पिरेटेड इंजन देण्यात आले आहे. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह जोडलेले असून 76bhp पॉवर आणि 97Nm टॉर्क जनरेट करते. Tata Altroz CNG च्या मायलेज बाबत अद्याप तपशील समोर आलेला नाही. तर दुसरीकडे, Maruti Baleno CNG मधेही 1.2-लिटर नेचरली एस्पिरेटेड इंजन देण्यात आले आहे. यात 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन हा एकमेव पर्याय आहे. हे इंजिन 76.4bhp पॉवर आणि 98.5Nm टॉर्क जनरेट करते. Baleno CNG चे मायलेज प्रतिकिलो 30.61 किमीपर्यंत आहे.

फीचर्स

टाटा अल्ट्रोझमध्ये सनरूफ उपलब्ध असेल, तर दुसरीकडे Baleno CNG मध्ये सनरूफ उपलब्ध नाही. टाटा अल्ट्रोझमध्ये इंजिन स्टार्ट-स्टॉप पुश बटण, 7-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स, फ्रंट आणि रिअर यूएसबी, रिअर एअर कंडिशन व्हेंट्स यांसारखे फीचर्स मिळतात तर दुसरीकडे मारुती बलेनोमध्ये टोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, मल्टी-फंक्शन स्टिअरिंग व्हील, इंजिन स्टार्ट स्टॉप बटण, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, एलॉय व्हील यांसारखे फीचर्स मिळत आहेत.

किंमत किती?

दोन्ही गाड्यांच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, मारुती बलेनो सीएनजीची किंमत ८.३५ लाख ते ९.२८ लाख रुपये आहे तर दुसरीकडे Tata Altroz ​​CNG ची किंमत 7.50 लाख ते 9.50 लाख रुपयांपर्यंत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.