Tata Capitals IPO : Tata लॉन्च करणार 17000 कोटींचा IPO; पहा संपूर्ण डिटेल्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जे लोक आयपीओमध्ये ( Initial Public Offering )गुंतवणूक करतात त्यांच्यासाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. टाटा समूहाच्या आणखी एका प्रमुख कंपनीचा आयपीओ बाजारात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच टाटा कॅपिटल लिमिटेड ही कंपनी सप्टेंबर 2025 मध्ये आपला आयपीओ लाँच करू शकते, अशी माहिती अनेक सूत्रांच्या माध्यमातून समोर येत आहे. त्याचसोबत हा आयपीओ जवळपास 17000 कोटी रुपयांचा असू शकतो , असे सांगण्यात येत आहे. तर चला जाणून घेऊयात यासंदर्भातील सर्व माहिती.

भारतातील अग्रगण्य नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी –

टाटा कॅपिटल ( Tata Capital ) ही भारतातील अग्रगण्य नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी (NBFC) असून विविध वित्तीय सेवा पुरवते. यामध्ये रिटेल फायनान्सिंग, हाउसिंग फायनान्स, वेल्थ मॅनेजमेंट आणि इतर क्षेत्रांचा समावेश आहे. हा आयपीओ गुंतवणूकदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर आकर्षण ठरू शकतो, कारण टाटा समूहाच्या ब्रँडवर आधारित असलेले शेअर्स नेहमीच दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी पसंतीस येतात. त्यामुळे येणाऱ्या नववर्षात हा आयपीओ धुमाकूळ घालेल , असे अनेकांनी म्हटले आहे.

भांडवल उभारणीची मोठी संधी –

या आयपीओच्या माध्यमातून टाटा समूहाला आपल्या वित्तीय विभागाचा विस्तार करण्याची आणि भांडवल उभारणीची मोठी संधी मिळणार आहे. सध्या टाटा कॅपिटलने आयपीओसाठी आवश्यक परवानग्या मिळवण्यासाठी तयारी सुरू केली आहे , अशी माहिती पुढे आली आहे. त्यामुळे गुतंवणूकदारांसाठी हि संधी मोठी ठरू शकते. 2024 या आर्थिक वर्षात अनेक आयपीओ आले असून , 2025 या नववर्षात अजून आयपीओ (IPO)समाविष्ट होऊ शकतात , तसेच त्याच्या माध्यमातून जास्त नफा मिळवण्याची संधी प्राप्त होईल .