हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील टॉपची ऑटोमोबाईल कंपनी Tata Motors ने Tata Curvv ची ICE आवृत्ती भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. यापूर्वी हि कार इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये लाँच करण्यात आली होती, आता पेट्रोल आणि डिझेल व्हेरियंट मध्ये ती मार्केट मध्ये धुमाकूळ घालणार आहे. Tata Curvv ICE ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 9.99 लाख रुपये आहे. तर या एसयूव्हीच्या टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 17.69 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. आज आपण या कारचे खास फिचर, त्याचे इंजिन याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
इंजिन – Tata Curvv ICE
Tata Curvv ICE दोन पेट्रोल इंजिन आणि एक डिझेल इंजिनसह लॉन्च करण्यात आले आहे. यात 1.2 लीटर TGDi टर्बो पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 125PS पॉवर आणि 225Nm टॉर्क जनरेट करते.. दुसरे 1.2 लीटर पेट्रोल इंजिन असून हे इंजिन 120PS पॉवर आणि 170Nm टॉर्क जनरेट करते तर तिसरे 1.5 लिटर डिझेल इंजिन 118PS पॉवर आणि 260Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे तिन्ही इंजिन 6-स्पीड मॅन्युअल आणि 7-स्पीड DCT ऑटोमॅटिक गिअरबॉक्सला जोडण्यात आलं आहे.
फीचर्स –
Tata Curvv ICE मध्ये इलेक्ट्रिक मॉडेल प्रमाणेच 12.3-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, व्हॉइस असिस्टंटसह पॅनोरॅमिक सनरूफ, 9-स्पीकर JBL साउंड सिस्टम, हवेशीर अशा फ्रंट सीट्स, AQI डिस्प्लेसह एअर प्युरिफायर, मूड लाइटिंग फीचर्स यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत तर मागच्या सीट मध्ये बसणाऱ्या प्रवाशांसाठी टू-स्टेप रिक्लाइन फंक्शन, चार्जिंग इंडिकेटर, पॉवर्ड टेलगेट ,लेदर सीट्स, ऍपल कारप्ले कनेक्टिव्हिटी, यांसारखी वैशिट्ये मिळतात. सुरक्षिततेसाठी, या एसयूव्ही कार मधे 360 डिग्री कॅमेरा, फ्रंट पार्किंग सेन्सर्स, 6 एअरबॅग, ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग, एसओएस कॉलिंग फंक्शन, क्रूझ कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम मिळते.