Wednesday, February 8, 2023

Tata Electric Car : Tata च्या Electric गाड्यांवर बंपर डिस्काउंट; तुम्हीही घ्या लाभ

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल आणि डिझेलच्या (Tata Electric Car) वाढत्या किमतीमुळे अलीकडच्या काळात अनेक ग्राहकांची पसंती इलेक्ट्रिक वाहनाकडे वळत आहे. त्यामुळे ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी गेल्या वर्षभरात अनेक इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आणल्या आहेत. तुम्ही सुद्धा नव्या वर्षात इलेक्ट्रिक कार खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटारीने आपल्या काही इलेक्ट्रिक गाड्यांवर या महिन्यासाठी बंपर डिस्काउंट जाहीर केला आहे. चला जाणून घेऊया कोणकोणत्या गाड्यांचा यामध्ये समावेश आहे….

Tata Nexon EV Max

Tata Nexon EV Max – (Tata Electric Car)

- Advertisement -

Tata Nexon EV Max 2022 या मॉडेलमध्ये तुम्हाला 25,000 रुपयांचा रोख डिस्काउंट, 25,000 रुपये एक्सचेंज बोनस, 20,000 रुपये ग्रीन (Tata Electric Car) बोनस आणि 10,000 रुपये कॉर्पोरेट सूट मिळत आहे. याशिवाय, Tata Nexon EV Max 2023 मॉडेलला सर्व व्हेरिएन्ट वर 25,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस, 20,000 रुपयांचा ग्रीन बोनस आणि 10,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट मिळत आहे.

Tata Tigor EV Ziptron

टाटा टिगोर ईव्ही झिपट्रॉन- Tata Tigor EV Ziptron

या इलेक्ट्रिक कारवर 25,000 रुपयांची कॅश डिस्काउंट मिळत आहे. तसेच, ग्रीन बोनस, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट बोनसच्या माध्यमातून 50,000 रुपयांची अतिरिक्त बचत होऊ शकते. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की, तुम्ही (Tata Electric Car) एकाच वेळी एक्सचेंज बोनस आणि ग्रीन बोनसचा लाभ घेऊ शकत नाही.

Tata Nexon Prime 2022

टाटा नेक्सॉन प्राइम 2022 – Tata Nexon Prime 2022

या कारवर तुम्हाला या महिन्यात 40,000 रुपयांची कॅश डिस्काउंट मिळेल. (Tata Electric Car) याशिवाय, तुम्ही 25,000 रुपयांच्या एक्सचेंज बोनसचाही फायदा उठवू शकता. यासह, तुम्ही 20,000 रुपयांचा ग्रीन बोनस आणि 15,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट मिळवू शकता.