TATAने केली देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक SUV कार लाँच; इतकी असणार किंमत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅल्लो महाराष्ट्र । TATA मोटर्सने नॅनोच्या रूपात देशातील सर्वात स्वस्त कार बनवून सर्वसामान्यांचे कारचे स्वप्न केले. त्यानंतर आता भविष्यातील गरज ओळखून देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक SUV देण्याचा दावा TATA ने केला आहे. TATA मोटर्सने नेक्सॉन (Nexon EV) ही कॉम्पॅक्ट SUV श्रेणीतील नवी कार मंगळवारी लाँच केली. Tata Tigor या कारनंतर नेक्सॉन ही टाटाची दुसरी इलेक्ट्रिक आणि पहिली SUV कार आहे. याशिवाय देशातील आतापर्यंतची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक SUV असल्याचा दावा TATA मोटर्सने केला.

सिंगल चार्जिंगमध्ये धावणार ३१२ कि.मी.
नेक्सॉन (Nexon EV) ही इलेकट्रीक SUV केवळ सिंगल चार्जिंगमध्ये ३१२ कि.मी. पर्यंतचं अंतर पार करू शकेल, असा कंपनीचा दावा आहे. स्टँडर्ड १५ A AC चार्जरद्वारे बॅटरी २० टक्के ते १०० टक्के चार्ज करण्यासाठी ८ तासांचा वेळ लागेल. तर, फास्ट चार्जरद्वारे बॅटरी ६० मिनिटांत ० ते ८० टक्के चार्ज होऊ शकते.

un (27)

तीन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध होणार SUV
TATA नेक्सॉन (Nexon EV) च्या बेसिक व्हेरिअंट XM मध्ये फुल ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, दोन ड्राइव्ह मोड, की-लेस एंट्री आणि पुश बटण स्टार्ट, ZConnect कनेक्टेड कार अ‍ॅप, फ्रंट-रिअर पावर विंडो आणि इलेक्ट्रिक टेलगेट यांसारखे फीचर्स आहेत. सिग्नेचर टील ब्लू, ग्लेशिअर व्हाइट आणि मूनलाइट सिल्वर या तीन रंगांमध्ये ही इलेक्ट्रिक एसयुव्ही उपलब्ध आहे.

un (26)

एक देश एक किंमत
इलेक्ट्रिक नेक्सॉनच्या टॉप व्हेरिअंट XZ+ LUX मध्ये सनरूफ, प्रीमियम लेदर फिनिश सीट्स आणि ऑटोमॅटिक रेन सेंन्सिंग वायपर्स आणि ऑटोमॅटिक हेडलँम्प्स आहेत. नेक्सॉन ईव्हीच्या बेसिक व्हेरिअंटची किंमत 13.99 लाख, XZ+ ची 14.99 लाख रुपये आणि टॉप व्हेरिअंट XZ+ LUX ची किंमत 15.99 लाख रुपये आहे. या सर्व एक्स-शोरुम किंमती आहेत. लाँचिंगवेळी खुद्द रतन टाटा हे देखील उपस्थित होते.

un (25)

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

हे पण वाचा-

25 धावा करताच विराट कोहली मोडणार टी -20 मधील धोनीचे रेकॉर्ड

यंदाच्या आयपीएलमध्ये ‘या’ नवीन नियमाने सामन्यांचे निकाल बदलणार?

मोठी बातमी : PF खात्यासाठी आता युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) आवश्यक, घरबसल्या ‘या’ 7 स्टेपमध्ये काढा UAN