Tata Motors चा ग्राहकांना झटका; गाड्यांच्या किंमती पुन्हा वाढल्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नव्या वर्षात तुम्ही टाटा मोटर्सची गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. टाटा मोटर्सने आपल्या ग्राहकांना जोरदार झटका दिला आहे. याचे कारण म्हणजे कंपनीने 1 फेब्रुवारी 2023 पासून आपल्या गाड्यांच्या किमतीत वाढ केली आहे. कंपनीने जवळपास तीन महिन्यांत दुसऱ्यांदा गाड्यांच्या किमती वाढवल्या आहेत. यापूर्वी 7 नोव्हेंबर रोजी टाटा मोटर्सने प्रवासी वाहनांच्या किमती 0.90% ने वाढवल्या होत्या.

गाडी बनवण्यासाठी लागणाऱ्या कंपोनंटची वाढलेली किंमत आणि नवीन उत्सर्जन नियमांमुळे कार बनवण्याचा एकूण खर्च वाढत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेल पोर्टफोलिओच्या सर्व वाहनांच्या किमतीत वाढ करण्यात येत आहे. टाटा मोटर्सच्या म्हणण्यानुसार, वाहनांच्या किमतीत सुमारे 1.2% वाढ केली जाईल, जी विविध मॉडेल्स आणि प्रकारांसाठी वेगवेगळी असेल. टाटा मोटर्सने 2022 मध्येच पॅसेंजर कार सेगमेंटमध्ये येणाऱ्या कारच्या किमती वाढवण्याचे संकेत दिले होते, ज्यामध्ये कंपनीने इनपुट कॉस्टमध्ये वाढ झाल्याचे सांगितले होते.

टाटा मोटर्सच्या गाड्यांच्या किमती वाढवल्यानंतर कोणत्या मॉडेल्सच्या बेस व्हेरिएंटची किंमत काय असेल ते जाणून घ्या…

Tata Tiago- 5.51 Lakh
Tata Punch- 6.07 Lakh
Tata Tigor- 6.17 Lakh
Tata Altroz- 6.42 Lakh
Tata Nexon- 7.79 Lakh
Tata Harrier- 14.97 Lakh
Tata Safari- 15.63 Lakh

टाटा मोटर्सने गेल्या महिन्यात 72,997 युनिट्सची विक्री केली होती. कंपनीची प्रसिद्ध SUV Tata Nexon ही देशातील चौथी सर्वाधिक विक्री झालेली कार ठरली होती. तसेच टाटा मोटर्सने नेक्सॉनच्या 12,053 युनिट्सची विक्री केली होती. कंपनीने डिसेंबर 2022 मध्ये एकूण देशांतर्गत विक्रीत 10 टक्के वाढ नोंदवून 72,997 युनिट्सची नोंद केली होती, जी गेल्या वर्षी याच महिन्यात 66,307 युनिट्स होती.