TATAची ‘ही’ कार 1100 रुपयांत धावणार 1 हजार किमी; उद्यापासून बुकिंग सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टाटा मोटर्सची मागील आठवड्यात आपली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार Tiago EV लॉन्च केली होती. आता 10 ऑक्टोबरपासून या कारचे बुकिंग सुरू होणार आहे. टाटा मोटर्सने Tiago EV च्या ड्रायव्हिंग किमतीबाबत मोठा दावा केला आहे. पेट्रोल कारच्या तुलनेत ही कार चालवल्याने आपले 6.5 रुपये प्रति किलोमीटर वाचू शकतात, असे कंपनीने म्हटले आहे. यासाठी कंपनीने तुलनात्मक डेटाही सादर केलाय.

टाटा मोटर्सच्या म्हणण्यानुसार, जर तुम्ही या रेंजची कोणतीही पेट्रोल कार चालवली तर हजारो किलोमीटर प्रवास करण्यासाठी तुम्हाला 7,500 रुपयांचे पेट्रोल लागेल . त्याच वेळी, Tiago EV 1000 किलोमीटर चालवण्यासाठी फक्त 1,100 रुपये लागतील . अशाप्रकारे, पेट्रोल कारच्या तुलनेत तुम्ही 1000 किमी प्रवास करूनही जवळपास 6,500 रुपये वाचवू शकता.

Tiago EV चे बुकिंग 10 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होईल. ग्राहक कोणत्याही अधिकृत टाटा मोटर्स डीलरशिप किंवा वेबसाइटवर 21,000 रुपयांची टोकन रक्कम जमा करून Tiago Electric बुक करू शकतात. या कारची डिलिव्हरी जानेवारी 2023 पासून सुरू होईल. Tiago EV डिसेंबरपासून टेस्ट ड्राइव्हसाठी उपलब्ध होणार आहे. या इलेक्ट्रिक गाडीची किंमत 8.49 लाख ते 11.79 लाख रुपयांपर्यंत आहे .

Tiago EV दोन बॅटरी पर्यायांसह ऑफर केली जात आहे – एक 19.2 kWh युनिट आणि दुसरी म्हणजे 24 kWh युनिट. यामधील 24kWh बॅटरी पॅक एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 315 किमीची रेंज देण्यास सक्षम आहे. तर दुसरीकडे, 19.2 kWh बॅटरी पॅक पर्याय एका चार्जवर 250 किमी पर्यंत धावू शकतो. ही कार 5.7 सेकंदात 0 ते 60 किमी प्रतितास वेग पकडू शकते.