TCL 505 : TCL ने बाजारात आणलाय नवा Mobile; 50 MP कॅमेरा, 5,010 mAh बॅटरी अन बरंच काही …

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

TCL 505 : प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक कंपनी TCL ने बाजारात नवा मोबाईल आणला आहे. TCL 505 असे या मोबाईलचे नाव असून यामध्ये कंपनीने 6.75 इंच LCD डिस्प्ले सह 50 मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा देण्यात आला आहे. सध्या जागतिक बाजारात हा मोबाईल लाँच झाला असून लवकरच तो भारतात सुद्धा लाँच करण्यात येईल. मोबाईलची किंमत अजून तरी जाहीर करण्यात आली नसली तरी TCL कंपनी स्वस्तात मोबाईल लाँच करत असते त्यामुळे हा नवा स्मार्टफोन सुद्धा कमी किमतीत उपलब्ध असण्याची शक्यता आहे. आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स जाणून घेऊयात…..

6.75 इंच डिस्प्ले –

TCL 505 मध्ये 90Hz रिफ्रेश रेट आणि 400nits ब्राइटनेस सह 6.75 इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 720 x 1600 पिक्सेल रिझोल्यूशन मिळत. या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G35 octa-core प्रोसेसर देण्यात आला असून TCL चा हा मोबाईल Android 14 OS वर काम करतो. पॉवर साठी या मोबाईल मध्ये 5,010 mAh बॅटरी दिली असून ही बॅटरी 10W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या स्मार्टफोनमध्ये 4GB रॅम आणि 128GB इनबिल्ट स्टोरेज उपलब्ध असून ते मायक्रोएसडी कार्डने वाढवता येऊ शकते.

कॅमेरा – TCL 505

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, TCL 505 मध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतोय. यामध्ये F/1.8 अपर्चरसह 50-मेगापिक्सेलचा मुख्य सेन्सर आणि त्याच्या मागील पॅनेलवर 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी समोरील बाजूला 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. मोबाईलच्या अन्य फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास, मोबाईलमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, फेस अनलॉक फीचर्स, 3.5mm ऑडिओ जॅक, ब्लूटूथ आवृत्ती 5.1 आणि NFC सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.