हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Tea Price – आजची हि बातमी चहा प्रेमींसाठी महत्वाची ठरणार आहे. चहाच्या किंमतीबाबत टी कॉफी असोसिएशन ऑफ इंडियाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयात चहा पिताना जास्त पैसे मोजावे लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजेच आता लोकांच्या खिशाला फटका बसणार आहे. तर चला या किंमती कितीने आणि का वाढवल्या आहेत याची अधिक माहिती जाणून घेऊयात.
महाराष्ट्रात चहा 2 रुपयांनी महाग (Tea Price) –
टी कॉफी असोसिएशन ऑफ इंडियाकडून महाराष्ट्रात चहा 2 रुपयांनी महाग केला आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे चहाच्या उत्पादनात झालेली घट होय. भारतात जानेवारी ते ऑक्टोबर महिन्यात चहाच्या किंमती 18% वाढल्या आहेत. पण यंदाच्या वर्षी उत्पादनात 66.39 दशलक्ष किलोने घट झाल्यामुळे चहा पत्तीचे प्रोडक्शन कमी झाले . परिणामी चहा महाग झाला आहे.
भाव वाढीचा फटका सर्वसामान्यांना –
आसाम, गुहाटी, केरळ या ठिकाणी चहा (Tea Price)पत्तीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात करण्यात येते. पण चहा पत्तीचे प्रोडक्शन कमी झाल्यामुळे त्याच्या किंमती वाढल्या आहेत. या भाव वाढीचा फटका चहाप्रेमी ग्राहकना बसणार असून , चहाच्या कपामागे लोकांना 2 रुपय अधिक द्यावे लागणार आहेत. चहा प्रेमींसोबतच या वाढीचा परिणाम सर्वसामान्यांना देखील सहन करावा लागणार आहे. हा व्यवसाय जरी छोटा वाटत असला तरी त्यापासून होणारी उलाढाल बरीच मोठी आहे. तसेच हा चहा देशाच्या जीडीपी वाढीमागे महत्वाची भूमिका बजावत असल्याचे मानले जाते.