वीज अंगावर पडून जि.प. शिक्षकाचा मृत्यू, भर दुपारी वादळी वार्‍यासह पाऊस आला अन्..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी | पाटण तालुक्यातील दिवशी घाटात जुळेवाडी स्टॉपपासून ढेबेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बुधवारी दुपारी सोसाट्याच्या वाऱ्यासह पडलेल्या पावसात संतोष शंकरराव यादव (वय- 46, मूळ रा. गुळंब, ता. वाई. सध्या रा. ढेबेवाडी, ता. पाटण) या शिक्षकाच्या अंगावर वीज पडली. यात त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, संतोष यादव हे ढेबेवाडी विभागातील डोंगर पठारावरील कसणी येथील प्राथमिक शाळेत शिक्षक होते. बुधवारी शालेय पोषण आहारचे ऑडिट करण्यासाठी पाटण येथे गेले होते. काम संपवून ते दुपारी निघाले. दुपारी चार वाजता ते दिवशी घाटात जुळेवाडी स्टॉपच्या थोडेसे पुढे आले. यावेळी जोराच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पाऊस सुरू झाला होता. यावेळी त्यांचा मृत्यू झाला.

संतोष यादव हे वाई तालुक्यातील असून त्यांची नुकतीच वाई तालुक्यात बदली झाली होती. पुढील महिन्यात ते त्यांच्या गावापासूनच्या जवळच्या शाळेत जाणार होते. तोच त्यांच्यावर काळाचा घाला घातला आहे. गेल्या 5 वर्षापासून ते ढेबेवाडी विभागात कार्यरत होते. ढेबेवाडीचे सहायक पोलिस निरीक्षक अभिजीत चौधरी यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन मृतदेह कराड येथे शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.