Teachers Recruitment In Sindhudurg | ज्यांना शिक्षण बनण्याची इच्छा आहे. त्यांच्यासाठी खूप चांगली संधी चालून आलेली आहे. ती म्हणजे आता जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या 878 जागा भरवण्यासाठी प्रक्रिया राबवली जात आहे. या प्रक्रियेत आता 604 उमेदवारांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला पसंती दाखवली आहे. त्यामुळे आता या सिंधुदुर्ग जिल्ह्याला 604 शिक्षक मिळणार आहेत. तरीही यातील 274 जागा रिक्त राहिलेल्या आहे .राज्याच्या शिक्षण विभागाने ही माहिती पवित्र पोर्टलवर देखील जाहीर केलेली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या 878 रिक्त जागा आहेत. याची जाहिरात पवित्र पोर्टलवर 5 फेब्रुवारी रोजी जाहीर केली होती. यासाठी माध्यमिकच्या 56 पदांसाठी, उर्दू भाषेच्या 24 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. आता राज्याने रिक्त पदाच्या जवळपास 70 टक्के शिक्षकांची पदे भरण्याचा निर्णय घेतलेला आहे.
त्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा आणि उर्दू शाळा शिक्षक भरतीची यादी रविवारी रात्री शासनाने जाहीर केली. परंतु आता मुदत संपल्यावर पूर्ण राज्यात निवड यादी कधी जाहीर होणार. याकडे सगळ्यांचे लक्ष होते परंतु लोकसभा निवडणुकीपूर्वी यादी जाहीर होईल. अशी देखील माहिती देण्यात आलेली आहे. शासनाने ही यादी जाहीर केल्यानंतर यामध्ये राज्यभरातून 604 उमेदवारांनी जिल्ह्याची सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड केल्याचे समोर आलेले आहे.
उर्दू भाषेसाठी केवळ 11 उमेदवार | Teachers Recruitment In Sindhudurg
या जिल्हा परिषदेच्या उर्दू माध्यमातील शाळांमध्ये रिक्त पदांच्या 25 शिक्षकांची पदे भरण्याची जाहिरात पवित्र पोर्टलवर जाहीर झाली होती. ही यादी सुद्धा शासनाने जाहीर केली आहे. यामध्ये केवळ 11 जणांनी या जिल्ह्याला पसंती दिलेली आहे. त्यातील आता उर्दू भाषेतील 14 रिक्त पदे राहिलेली आहेत.
यातील काही विद्यार्थी टीईटी उत्तीर्ण
पात्र ठरलेले काही उमेदवार टीईटी परीक्षा उत्तीर्ण झालेले नाहीत. त्यामुळे आता त्यांची कागदपत्रे तपासताना शिक्षकांची चांगलीच कसोटी लागणार आहे. परंतु अजून कागदपत्रांची तपासणी कधी करायची हे निश्चित झालेले नाही.