Tecno Pova 6 Neo 5G : फक्त 12,999 रुपयांत लाँच झाला 108MP कॅमेरावाला मोबाईल

Tecno Pova 6 Neo 5G
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुम्ही जर स्वस्तात मस्त आणि चांगली कॅमेरा क्वालिटी असलेला ,मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण भारतीय बाजारात 108MP कॅमेरावाला नवा स्मार्टफोन लाँच झाला आहे ज्याची किंमत अवघी 12,999 रुपये आहे. होय, मोबाईल निर्माता ब्रँड Tecno ने Tecno Pova 6 Neo 5G नावाचा मोबाईल बाजारात आणला आहे. आज आपण या स्मार्टफोनचे खास फीचर्स आणि स्पेसिफिकेशन जाणून घेऊयात…..

6.67 इंचाचा डिस्प्ले –

Tecno Pova 6 Neo 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेट सह 6.67 इंचाचा HD+ IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 720×1600 पिक्‍सल्‍स रिझोल्युशन आणि 480 निट्स पीक ब्राईटनेसचा सपोर्ट मिळतो. कंपनीने या स्मार्टफोन मध्ये MediaTek Dimensity 6300 चिपसेट बसवली असून त्यानुसार हा मोबाईल 8GB रॅम सह येतोय. मात्र व्हर्चुअल रॅम द्वारे हीच रॅम तुम्ही 16GB पर्यंत वाढवू शकता. तसेच मायक्रोएसडीच्या मदतीने स्मार्टफोनचे स्टोरेज 1TB पर्यंत वाढवू शकाल. टेक्नोचा हा हँडसेट Android 14 आधारित HiOS 14.5 या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो.

कॅमेरा- Tecno Pova 6 Neo 5G

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Tecno Pova 6 Neo 5G मध्ये 108Mचा मुख्य कॅमेरा मिळतो, या कॅमेराला AI फीचर्स मिळतात. तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 8MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. स्मार्टफोनमध्ये 5 हजार mAh ची बॅटरी बसवण्यात आली असून ही बॅटरी 18 वॉट चार्जिंगला सपोर्ट करते. अन्य फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास, यामध्ये इन्फ्रारेड सेन्सर, एनएफसी आणि लाईट सेन्सरची सुविधा आहे.

किंमत किती?

Tecno Pova 6 Neo 5G च्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 12,999 रुपये आहे, तर 8GB रॅम आणि 256GB मॉडेलची किंमत 13,999 रुपये आहे. फोनच्या खरेदीवर 1000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळत आहे. येत्या 14 सप्टेंबरपासून हा मोबाईल Amazon आणि निवडक रिटेल स्टोअरमध्ये उपलब्ध असेल.