महाबळेश्वरातील निझामांचा अलिशान बंगला तहसीलदारांकडून सील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील सुमारे 15 एकर 15 गुंठे भुखंड असलेला अलिशान वुडलाॅन बंगला हैद्राबाद येथील निझामांना देण्यात आला होता. या मालमत्तेवर शनिवारी सकाळी कारवाई करण्यात आली. साताऱ्याचे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या आदेशानुसार महाबळेश्वर तहसिलदार सुषमा चौधरी पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने पोलिस बंदोबस्तात बंगला सील करत मालमत्ता ताब्यात घेतली.

याबाबत अधिक माहिती अशी की, महाबळेश्वर या ठिकाणी बांधण्यात आलेला मुख्य बंगला व परीसरात असलेल्या सर्व इमारतीचे भूखंड ब्रिटीशांनी भाडेपट्ट्याने पारशी वकिल यांना दिले होते. त्यानंतर कालांतराने 1952 साली नबाब मीरसाब उस्मान अल्लीखान बहादुर नबाब आॅफ हैद्राबाद यांच्या नावे हा बंगला करण्यात आला. मात्र, या मालमत्तेचा आयकर कर रुपये 59 लाख 47 हजार 797 भरला नसल्याने याबाबर जिल्हा प्रशासनाने आयकर वसुलीसाठी टॅक्स रिकव्हरी आॅफिसर कोल्हापुर या माहिती दिली. त्यानंतर त्यांच्या पत्रांनुसार थकबाकीची नोंद मिळकत कार्डावर करण्यात आली आहे. तसरच मालमत्ता जप्तीची कारणाची करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

आजच्या बाजार भावाप्रमाणे ही मिळकतीची किंमत 200 ते 250 कोटी रूपचांची असून ब्रिटीशांनी हा भुखंड भाडेपट्ट्याने पारशी वकिल यांना दिला होता. यापूर्वी 1 डिसेंबरला ही मिळकत ताब्यात घेण्यासाठी आलेल्या 60 ते 70 लोकांच्या जमावामुळे या भागात तणाव निर्माण झाला होता. याआधीही अनेक वेळा मिळकत ताब्यात घेण्यावरून वाद झाले. ही बाब लक्षात घेवुन सातारचे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी 2 डिसेंबरला तहसिलदार सुषमा चौधरी पाटील यांना ‘वुडलाॅन’ ही मिळकत ताब्यात घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर ३ डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता तहसिलदार सुषमा चौधरी आणि त्यांचे पथक वुडलॉन बंगल्यावर दाखल झाली.

येथील मुख्य बंगल्या शेजारीच्या स्टाफ क्वार्टरमध्ये अनेक वर्षे माजी नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे आणि त्यांचे पती माजी नगरसेवक कुमार शिंदे राहत आहेत. त्यांना शासकीय कारवाईची माहिती देवून सर्व साहित्य बाहेर घेऊन बंगला सोडण्यास सांगितले. आदेशाप्रमाणे शिंदेंनीही संध्याकाळी 5 पर्यंत बंगला रिकामा केला. यानंतर तहसिलदारांसमक्ष मुख्य बंगल्याच्या सर्व खोल्यांना, निझामांच्या स्टाफ क्वार्टरला आणि दोन्ही गेटला सील केले.