तेलंगणामध्ये भाजप नेत्याची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हैदराबाद : वृत्तसंस्था – हैदराबादमधील तेलंगणा या ठिकाणी भाजप नेते ज्ञानेंद्र प्रसाद (MLA Gyanendra Prasad) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे उघडकीस आले आहे. ज्ञानेंद्र प्रसाद (MLA Gyanendra Prasad) यांनी आपल्या घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मात्र त्यांनी नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

काय घडले नेमके ?
ज्ञानेंद्र प्रसाद (MLA Gyanendra Prasad) हे सरलिंगमपल्ली मतदारसंघातून पक्षाच्या राज्य कार्यकारिणी समितीचे सदस्य होते. पेंटहाऊसमधील एका खोलीत ते पंख्याला लटकलेल्या अवस्थेत त्यांच्या स्वीय सहायकाला आढळून आला. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी ज्ञानेंद्र प्रसाद (MLA Gyanendra Prasad) यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता त्यांना त्या ठिकाणी कोणतीही सुसाईड नोट आढळून आली नाही.

सोमवारी सकाळी ज्ञानेंद्र प्रसाद यांनी (MLA Gyanendra Prasad) त्यांच्या पीएला झोपायला जात असल्याने त्रास देऊ नका, असं सांगितलं. नंतर पीएनं नाश्ता देण्यासाठी खोलीचा दरवाजा ठोठावला असता, आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर पीएनं खिडकीच्या काचा फोडल्या, तेव्हा त्यांना ज्ञानेंद्र प्रसाद खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळले असल्याची माहिती ज्ञानेंद्र प्रसाद (MLA Gyanendra Prasad) यांच्या पीएकडून देण्यात आली आहे. ज्ञानेंद्र प्रसाद यांच्या (MLA Gyanendra Prasad) नातेवाईकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई

धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या

Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर

हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर