नवीन सिम कार्ड खरेदी करताना E – KYC अनिवार्य; दूरसंचार विभागाचा नवा नियम

Sim card
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नवीन सिम खरेदी करणाऱ्या नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे आता दूरसंचार विभागाने सिम खरेदी करण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि सुरक्षित करण्यासाठी काही महत्वपूर्ण नियम बदल केलेले आहेत. त्यामुळे आता एअरटेल, रिलायन्स, जिओ, बीएसएनएल आणि वोडाफोन आयडिया या कंपनीचे सिम विकत घेताना तुम्हाला काही महत्त्वपूर्ण नियमांचे पालन करावे लागणार आहे. त्यामुळे आता सिम खरेदी करण्याची प्रक्रिया ही पेपरलेस बनलेली आहे. सिम खरेदी करणाऱ्या नागरिकांसाठी ही अत्यंत सोयीची गोष्ट आहे.

दूरसंचार विभागाने आता नवीन नियम काढलेले आहे. त्यानुसार आता युजर्स सिमखरेदी करण्यासाठी किंवा ऑपरेटर बदलण्यासाठी दूरसंचार कंपनीच्या कार्यालयांना भेट देण्याची काहीच गरज नाही. ही प्रक्रिया आता तुम्ही तुमच्या मोबाईलवरून डिजिटल पद्धतीने करू शकता. त्यामुळे तुम्हाला जर नवीन सिम कार्ड विकत घ्यायचे, असेल किंवा पोर्ट करायचे असेल, तर तुम्ही फोटो कॉपी तसेच इतर कागदपत्र दाखल करून ऑनलाईन पद्धतीने तुमचे कागदपत्र व्हेरिफाय करू शकता.

दूरसंचार विभागाने त्यांच्या अधिकृत X हॅण्डलवर ही माहिती दिलेली आहेत. तसेच सिम खरेदी करण्यासाठी लागणारे नवीन नियम देखील शेअर केलेले आहेत. या नवीन बदलांमुळे आता फसवणूक कमी होणार आहे. आणि व्यवस्थित पद्धतीने सगळ्या गोष्टी होणार आहेत. सरकारच्या या डिजिटल इंडिया उपक्रमानुसार पेपरलेस पद्धतीने सगळ्या गोष्टी होणार आहेत. त्यामुळे अनेक गोष्टींपासून सुरक्षितता होणार आहे.

डीओटीने केलेल्या नवीन नियमानुसार आता इ केवायसी आणि ऑटो केवायसी करणे गरजेचे आहे. तसेच युजर्सला कोणत्याही दूरसंचार ऑपरेटरच्या कार्यालयात भेट देण्याची गरज नाही. ते स्वतःच डिजिटल पद्धतीने या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करू शकतात. जसे की प्रीपेड ते पोस्टपेड स्विच करणे. या गोष्टी देखील ऑनलाईन पद्धतीने केल्या जाऊ शकतात. तसेच सिम कार्ड खरेदी करण्याची प्रक्रिया आता कोणतेही फोटोकॉफी शेअर न करता डिजिटल पद्धतीने केली जाऊ शकते. डिजिटल सिस्टीम कागदपत्रांचा गैरवापर करण्याचा काही प्रकार समोर आला होता. हा गैरवापर रोखण्यासाठी आणि कोणत्याही प्रकारे बनावट सिम कार्ड जारी करू नये. यासाठी आणि फसवणुकीचा धोका कमी करण्यासाठी आता डिजिटल पद्धतीने सगळ्या गोष्टी होणार आहे.

आधार E – KYC आणि ऑटो kYC म्हणजे काय?

आधार ई केवायसी

आधार ई केवायसी करताना युजर्स डिजिटल पद्धतीने आपल्या आधार कार्ड वापरून सिम कार्ड खरेदी करावे लागणार आहे. यासाठी त्यांना दूरसंचार ऑपरेटरला एक रुपया खर्च करून आपले आधार कार्डचे सगळे तपशील द्यावे लागणार आहेत.

ऑटो केवायसी

युजेसला आता डीजी लॉकर वापरून ऑनलाईन पद्धतीने त्यांचे डॉक्युमेंट्स देता येणार आहे. हे ऑटो केवायसी करण्याची प्रक्रिया ग्राहकांना केवायसी प्रक्रिया स्वतंत्रपणे करण्यास मदत करेल. आणि नवीन सिम देखील अगदी सोप्या पद्धतीने खरेदी करू शकतात.