टँकरचे पाणी पीत असताना वारकऱ्यांना टेम्पोची धडक; एकाचा मृत्यू, गाडीचालक ताब्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंढरपूर ते आळंदी कार्तिकी वारीला गेलेल्या वारकऱ्यांचा अपघात झाला आहे. टँकरचे पाणी पीत असताना पाठीमागून येऊन पिकअप टेम्पोने वारकऱ्यांना जोराची धडक दिली आहे. या अपघातात 4 विद्यार्थी वारकरी जखमी झाले असून 1 जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात आज पहाटे 4:00 ते 4:30 दरम्यान झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, वाल्हे आणी जेजुरीच्या मध्ये वारकरी टँकरचे पाणी पिण्यासाठी उभे असताना अचानक पाठीमागून पिकअप ने धडक दिली. पिकअप ला लाईट नसल्याने चालकाला अंदाज आला नाही. यामध्ये 4 विद्यार्थी वारकरी जखमी झाले असून 1 जणांचा मृत्यू झाला आहे. संजय पवार (खेड) असे सदर ड्रायवरचे नाव आहे.

या अपघातानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पोलिसांनी सदर टेम्पो चालकाला ताब्यात घेतलं आहे. या चालकाची चौकशी केली जात आहे. मात्र प्रशासनाच्या हलगर्जी पणामुळे वारकऱ्याला प्राण गमवावा लागला अस वारकऱ्यांचे म्हणणं आहे. निष्पाप वारकऱ्यांचा प्राण गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने वारकऱ्यांकडे लक्ष्य द्यावे अशी विनंती सुद्धा वारकऱ्यांकडून करण्यात येत आहे.