Territorial Army : सचिन, धोनी, अभिनव बिंद्रा बॉर्डरवर जाणार? सरकारकडून टेरिटोरियल आर्मी सक्रीय करण्याचे आदेश

Territorial Army
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Territorial Army । जम्मू काश्मीर येथील पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानात संघर्षाची ठिणगी पडली आहे. भारताने पाकच्या कारवाईला चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर सुद्धा पाकिस्तानच्या कुरघोडी थांबायचं नाव घेईनात. पाकिस्तान कडून काल रात्रभर भारतातील जवळपास २६ शहरांवर ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. भारतीय लष्कराने हे सर्व प्रयत्न हाणून पाडले असले तरी पाकिस्तानचे शेपूट अजूनही वाकडेच आहे. पाकिस्तानकडून क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे आणि सीमावर्ती भागात परिस्थिती तणावपूर्ण आहेयाच पार्श्वभूमीवर सरकारकडून टेरिटोरियल आर्मी सक्रीय करण्याचे आदेश देण्यात आलेत. भारत सरकारने लष्करप्रमुखांना अधिकार दिले आहेत की ते गरज पडल्यास प्रादेशिक सैन्यातील सर्व अधिकारी आणि सैनिकांना बोलावू शकतात. सरकारच्या या निर्णयानंतर सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी आणि कपिलदेव हे दिग्गजही पाकिस्तान विरोधात २ हात करण्यासाठी बॉर्डरवर जाणार का? या चर्चाना उधाण आलं आहे.

टेरिटोरियल आर्मी म्हणजे काय- Territorial Army

टेरिटोरियल आर्मी (Territorial Army) ही भारतीय सैन्याची एक सहाय्यक दल आहे, जी अर्धवेळ स्वयंसेवकांच्या आधारावर काम करते. याला देशाच्या संरक्षणाची दुसरी लाईन देखील म्हणतात. नियमित सैन्याला कायमस्वरूपी कर्तव्यातून मुक्त करणे, आपत्कालीन परिस्थितीत मदत करणे आणि आवश्यक सेवा राखणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट असते. सध्या प्रादेशिक सैन्यात ५० हजार सैनिक आहेत. त्यात ६५ युनिट्स आणि ३२ इन्फंट्री बटालियन आहेत. यापैकी १४ बटालियन दक्षिण कमांड, पूर्व कमांड, पश्चिम कमांड, मध्य कमांड, उत्तर कमांड, दक्षिण पश्चिम कमांड, अंदमान आणि निकोबार कमांड आणि आर्मी ट्रेनिंग कमांड (ARTRAC) या क्षेत्रांमध्ये तैनात केल्या जातील.

हे पण वाचा : घुसखोरीचा फडशा ! भारताकडून पाकचे 4 एअरबेस आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त, पहा व्हिडीओ

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा टेरिटोरियल आर्मीमध्ये (Territorial Army) लेफ्टनंट कर्नल आहे. तो पॅराशूट रेजिमेंटचा आहे. यासाठी त्यानं प्रशिक्षणही घेतले आहे. परंतु त्याची भूमिका तरुणांना प्रोत्साहन देण्यापुरती मर्यादित आहे. १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघाचा कॅप्टन कपिल देव यांना २००८ मध्ये पंजाब रेजिमेंटमध्ये मानद लेफ्टनंट कर्नल म्हणून नियुक्त करण्यात आले. ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा यांना २०११ मध्ये शीख रेजिमेंटमध्ये मानद लेफ्टनंट कर्नलची पदवी देण्यात आली.मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा भारतीय हवाई दलात ग्रुप कॅप्टन आहे. 2010 मध्ये सचिनला ही रॅक देण्यात आली होती. सचिन तेंडुलकर युवकांचा स्टार आहे. त्यामुळे त्याच्या माध्यमातून युवकांना भारतीय लष्कराकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला गेला. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना 1990 मध्ये ‘प्रहार’ चित्रपटासाठी टेरिटोरियल आर्मी म्हणून प्रशिक्षण देण्यात आले होते. १९९९ च्या कारगिल युद्धात त्यांनी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटमध्ये मेजर म्हणून काम केले.