रशियाच्या राजधानीमध्ये दहशतवादी हल्ला; 70 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू; अनेकजण गंभीर जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| रशियाची (Russia) राजधानी मॉस्कोमधील (Moscow) क्रोकस सिटी हॉलमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केल्यामुळे 70 पेक्षा अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 115 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. यातील 60 जणांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटने घेतली आहे. हा हल्ला ज्यावेळी झाला जेव्हा रशियाच्या प्रसिद्ध रॉक बँड पिकनिकचे परफॉर्मन्स पाहण्यासाठी कॉन्सर्ट हॉलमध्ये प्रचंड गर्दी जमली होती. या गर्दीमध्येच पाच आतंकवादी शिरले आणि त्यांनी बेछूट गोळीबार करण्यास सुरुवात केली. (Terrorist Attack In Moscow)

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, शुक्रवारी क्रोकस सिटी हॉलमध्ये प्रसिद्ध रशियन रॉक बँडच्या मैफिलीमध्ये सहभागी होण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. या हॉलमध्ये तब्बल 60 हजारपेक्षा अधिक लोक जमा झाले होते. त्याचवेळी ISIS च्या दहशतवाद्यांनी हॉलमध्ये येऊन गोळीबार करण्यास सुरुवात केली. तसेच स्फोट ही केले. हे हल्लेखोर हॉलमध्ये लष्कराच्या वेशामध्ये आले होते. त्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे 70 पेक्षा अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला. तर कित्येक लोक जखमी झाले. सध्या जखमी झालेल्या लोकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुख्य म्हणजे या घटनेमुळे तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले की, सर्व हॉलमध्ये गोंधळ पसरला होता. गोळ्यांचा आवाज लांब लांबपर्यंत ऐकू येत होता. लोक आपला जीव वाचवण्यासाठी सैराभैरहून पळत होते. परंतु दहशतवाद्यांनी आपला हल्ला थांबवला नाही. यानंतर दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी पोलिसांची स्पेशल टीम घटनास्थळी दाखल झाली. या कारवाईमध्ये हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली. पोलिसांच्या मदतीने घटनास्थळी 50 पेक्षा अधिक रुग्णवाहिका बोलवण्यात आल्या. या रुग्णावाहिकेमधूनच सर्व जखमी नाव उपचारासाठी रुग्णालय दाखल करण्यात आले. या सर्व घटनेबाबत मॉस्कोचे महापौर सर्गेई सोब्यानिन यांनी दुःख व्यक्त केले आहे.

दरम्यान, या दहशतवादी हल्ल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओमध्ये गोळ्यांच्या आवाजात लोकांचा भितीदायक आवाजही ऐकू येत आहे. या व्हिडिओच्या मार्फतच आपल्याला समजू शकते की हा हल्ला किती भयानक पद्धतीने करण्यात आला असावा. सध्या या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली जात आहे.