हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सातत्याने प्रगती होत असताना दिसत आहे. त्यातच टेस्ला Optimus मानव रोबोटची ओळख करून देत आहे. हा रोबोट घरगुती कामासोबतच पॅकेज वाहून नेहण्यासाठी वापरला जाऊ शकतो . या इनोवेशनमुळे आर्थिक उत्पादनात सुधारणा होईल . टेस्लाचे CEO एलन मस्क यांनी नवीन इनोवेशनची घोषणा केली आहे. ज्यामध्ये Robovan वाहनासोबतच Optimus मानव रोबोटसुद्धा लाँच करण्यात आला आहे. या रोबोटला दैनंदिन कामासाठी अतिशय महत्वाचे मानले जाणार आहे. हा रोबोट वेगवेगळ्या कामासाठी डिझाइन केला गेला आहे.
सर्वात मोठे इनोवेशनं
इतर रोबोटच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, या रोबोटला डान्ससुद्धा करता येतो , त्यामुळे लोकांचे मोठ्याप्रमात मनोरंजन होणार आहे. . एलन मस्क यांनी रोबोटची प्रशंसा करताना म्हटले की, हे आतापर्यंतचे सर्वात मोठे इनोवेशनं आहे . टेस्लाने अखेरीस लाखो युनिट्स तयार करेल. जिथे कोणतीही गरीब परिस्थिती नसेल. एलन मस्क यांच्या कडून ऑप्टिमस प्रोजेक्टची सुरूवात 2021 मध्ये करण्यात आली होती. 2022 मध्ये, टेस्लाच्या या उपक्रमाची भरभरून प्रशंसा होत आहे आणि मानवाकृती रोबोट म्हणून हे खूप पसंतीत येत आहे.
रोबोटची किंमत
टेस्ला कडून रोबोटची किंमत 20000 डॉलर आणि 30000 डॉलर दरम्यान ठेवण्यात आलेली आहे. या रोबोटची खासियत अशी की, हा तुमच्या बरोबर चालू शकतो आणि तुम्ही त्याला कोणतेही काम देऊ शकता. तसेच याच्या मदतीने घरगुती सर्व कामे केली जाऊ शकतात. लहान गोष्टींपासून ते मोठ्या गोष्टीपर्यंत हा रोबोट कार्य करेल . यामध्ये कप उचलण्यापासून ते लहान गिफ्ट बॅग उचलण्यापर्यँत सर्व काही समाविष्ट आहे. तुम्ही त्याच्यासोबत गेम देखील खेळू शकता . या सर्व गुणांमुळे लोकांना त्याबाबत उत्सुकता लागली आहे.