हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Tesla Y Model Car Price । जगातील सर्वात श्रीमंत व्यक्त असलेल्या एलोन मस्क यांच्या Tesla कंपनीचे भारतातील पहिले शोरूम मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे आजपासून खुलं झाले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हस्ते या शोरूमचे उद्घाटन पार पडलं. मुंबईतील या शोरूमच्या माध्यमातून टेस्लाने भारतात आपल्या व्यवसायाला सुरुवात केली आहे. टेस्ला साठी भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातोय. भारतात टेस्ला तिचे Y Model विकणार आहे. यातील पहिले मॉडेल मॉडेल वाय रीअर-व्हील ड्राइव्ह (RWD) आहे, ज्याची किंमत ६० लाख रुपये आहे. दुसरे मॉडेल मॉडेल वाय लॉन्ग रेंज RWD आहे, ज्याची किंमत ६८ लाख रुपये आहे. कंपनीने त्यांच्या वेबसाइटवर किमतींबद्दल माहिती दिली आहे.
इतर देशाच्या तुलनेत भारतात टेस्ला कारच्या किमती (Tesla Y Model Car Price) महाग आहेत. अमेरिकेत, मॉडेल Y ची सुरुवात $44,990 पासून होते, तर चीनमध्ये त्याची किंमत 263,500 युआन आणि जर्मनीमध्ये 45,970 युरो आहे. भारतात किमती जास्त असल्याचे महत्वाचे कारण म्हणजे आयात शुल्क. मॉडेल Y हे टेस्लाच्या शांघाय प्लांटमधून मॉडेल वाय मुंबईत आले आहे. या वाहनांवर प्रति युनिट २१ लाखांपेक्षा जास्त आयात शुल्क आहे. परिणामी ही कार पूर्णपणे आयात (CBU) करून आणली जात असल्यामुळे गाडीची किंमत महाग झाली. याशिवाय तुम्हाला जर तुमच्या आवडीचा रंग हवा असेल तर यासाठी आणखी पैसे मोजावे लागतील. उदाहरणार्थ, पर्ल व्हाइट मल्टी-कोट साठी 95,000 रुपये अतिरिक्त, डायमंड ब्लॅकसाठी 95,000 रुपये अतिरिक्त, ग्लेशियर ब्लूसाठी 1,25,000 रुपये अतिरिक्त, क्विक सिल्व्हर रंगासाठी 1,85,000 रुपये अतिरिक्त आणि अल्ट्रा रेडसाठी 1,85,000 रुपये जास्तीचे खर्च करावे लागतील. परंतु टेस्लाच्या या कारचे फीचर्स आणि लूक पाहून तुम्हीही थक्क व्हाल. Tesla Y Model Car Price
सिंगल चार्जवर 500 KM रेंज – Tesla Y Model Car Price
टेस्ला मॉडेल Y चे नवीन व्हर्जन खूपच अत्याधुनिक आहे. गाडीचा लूक आणि डिझाईन आकर्षिक करणारा आहे, खास करून तरुणाईला तिची नक्कीच भुरळ पडेल. समोरील बाजूला आकर्षक आणि आधुनिक पद्धतीच्या हेडलाईट पाहायला मिळतायत. मागील बाजूस कनेक्टेड टेल लाइट्स देण्यात आले आहेत. मॉडेल Y RWD व्हेरिएन्ट सिंगल चार्जवर ५०० किलोमीटर अंतर पार करते तर मॉडेल Y लाँग रेंज रीअर-व्हील ड्राइव्ह व्हेरियंट मध्ये तब्बल ६२२ किमी रेंज मिळतेय. या दोन्ही इलेक्ट्रिक कारचे टॉप स्पीड २०१ किमी प्रतितास इतकं आहे. महत्वाची बाब म्हणजे अवघ्या हि इलेक्ट्रिक कार अवघ्या 5.6 सेकंदात शून्य ते 100 इतका वेग गाठू शकते