महाराष्ट्रात गुंडांचे राज्य; मुख्यमंत्र्यांना अटक करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार (Ganpat Gaikwad Firing) प्रकरणावर ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. गणपत गायकवाड यांनी गोळीबार प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच थेट आरोप केले होते. याच मुद्द्याला हात घालत सामनातून शिंदेंना (Eknath Shinde) अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. हे संपूर्णपणे मनी लौंड्रीन्ग प्रकरण असून ईडी वाल्यानो आता वर्षावर समन्स पाठवा असा खोचला टोलाही ठाकरे गटाने लगावला आहे.

सामना अग्रलेखात नेमकं काय म्हंटल??

उल्हासनगर येथील पोलीस स्टेशनमध्ये आमदार गायकवाड यांनी शिंदे गँगचा सदस्य महेश गायकवाड याच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात शिंदे गँगचे दोन सदस्य जखमी झाले. स्वतः मुख्यमंत्री हे आपल्या गँगच्या जखमींना पाहण्यासाठी इस्पितळात गेले व हळहळले. मुख्यमंत्र्यांच्या जिल्हयातले हे गँगवॉर संपूर्ण देशाने पाहिले. त्यामुळे ते देशाचे गृहमंत्री अमित शहा व पंतप्रधान मोदी यांनीही पाहिलेच असेल. इतक्या भयंकर घटनेवर त्यांची अद्यापि प्रतिक्रिया नाही. बिगर भाजपशासित राज्यात मुंगी पादली तरी या मंडळींची प्रतिक्रिया येते, पण महाराष्ट्रात शहा मोदी यांनी नेमलेल्या मुख्यमंत्र्याच्या नावाने गुंडगिरी, रक्तपात सुरू आहे. त्यावर हे ‘संस्कार भारती’ तोंड उघडायला तयार नाहीत. “आमच्यासारख्या चांगल्या माणसांना एकनाथ शिंदनी गुन्हेगार केले,” असे आमदार गायकवाड यांनी सांगितले. पोलिसानी गायकवाड यांचा हा कबुलीजवाब गांभीर्याने घ्यायला हवा.

मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्या बाळराजांनी ठाणे-कल्याणसह तपूर्ण राज्यात गुंडगिरीचा धुडगूस घातला आहे. ठेकेदारी, अपहरण, खंडणी, धमक्या, हत्या, जमिनींचा कब्जा घेणे असे गुन्हे सरकारी आशीर्वादाने घडत आहेत व आपल्या गँगच्या लोकांना या कामात कोणतेही अडथळे येऊ नयेत यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात निवृत्त पोलीस अधिकाऱयांची विशेष नेमणूक केली आहे, महाराष्ट्रात गुन्हेगारांचे राज्य चालवले जात आहे. गणपत गायकवाड यांना मुख्यमंत्र्यांनी पोसलेल्या गुंडांविरुद्ध पोलीस स्टेशनातच हत्यार उचलावे लागले व गुंडांवर गोळ्या झाडल्याचा आपल्याला पश्चात्ताप होत नसल्याचे आमदार गायकवाड म्हणाले. गायकवाड यांच्या मुलावर पोलीस स्टेशनातच हल्ला झाला. हल्लेखोरांना मुख्यमंत्र्यांच्या बाळराजांचे संरक्षण असल्याने पोलीसही मिथे बनले. जर माझ्यासमोर माझ्या मुलाला ते मारत असतील तर माझा जगून तरी काय फायदा? म्हणून मी आत्मसंरक्षणासाठी हत्यार उचलले असे गायकवाड म्हणतात. या सगळ्या प्रकरणाची आता उच्चस्तरीय चौकशी करण्याचे गृहमंत्री फडणवीस यानी ठरवले. हे ढोंग आहे. महाराष्ट्रातील गुंडाचे राज्य मोडून काढण्याची हिंमत त्यांच्यात नाही. कारण मुख्यमंत्री शिंद हेच गुंडांचे राज्य चालवत आहेत.

गणपत गायकवाड यांनी एक महत्त्वाचा कबुली जवाब दिला. एकनाथ शिंद यांच्याकडे माझे कोट्यवधी रुपये पडले आहेत. गायकवाड यांचा कबुली जबाब हाच FIR समजून हे मनी लॉण्डरिन’चे प्रकरण आहे या दिशेने तपास व्हायला हवा. ‘ईडी’ने गायकवाड यांचा जवाब घेऊन हेमंत सोरेनप्रमाणे शिंदे यांच्यावर त्वरित कठोर कारवाई केली पाहिजे. कोट्यवधी रुपये गायकवाड यांनी शिंदे याना का दिल है कोट्यवधी रुपने काही सरळ मागनि आलेले नाहीत. गुन्हेगारीतून आलेला पैसा मुख्यमंत्र्यानी स्वीकार हे सरळ मनी लॉण्डारीचे प्रकरण आहे व त्याबद्दल त्यांना ‘पीएमएलए कायद्याने अटकच व्हायला हवी. ‘इंडीवाल्यानो एकता ना? ऐकले असेल तर ‘वर्षा’ बगल्यावर समन्स पाठवा तरच कायद्याचे राज्य, नाहीतर महाराष्ट्रात चोराचे राज्य असून चोरच ते चालवीत आहेत!