गोपीचंद पडळकर म्हणजे तमासगीर…; ठाकरे गटाच्या नेत्याची घणाघाती टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीचे सरकार असतांना गोपीचंद पडळकर यांनी आंदोलन केले होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होऊन जोरदार हल्लाबोल केला होता. आता त्यांचे सरकार असताना गोपीचंद पडळकर का बोलत नाही. असती अनादिलनात त्यांनी तमाशा केल्याने ते तमासगीर आहेत, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे.

ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी आज नागपुरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, गोपीचंद पडळकर हे तमासगीर आहेत. पडळकरांनी हातात टाळ घेऊन आंदोलन केले होते. ते आजपासून एसटी कर्मचारी हे आंदोलन करीत आहे. आझाद मैदानावर 16 मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आंदोलनाला बसणार आहे.

विलणीकरनाची मागणी तेव्हा करणारे गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, गुणरत्न सदावर्ते आता का करत नाही. महाविकास आघाडी सरकार असतानाएसटी कर्मचाऱ्यांसाठी उद्धव ठाकरे यांनी 360 कोटी रुपये बाजूला ठेवत मोठा निर्णय घेतला होता. त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना मोठी वाढ देण्यात आली होती. तरीही भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आंदोलन करत आझाद मैदान येथे आंदोलन केले होते.

16 आमदार कायद्याने अपात्र व्हायला हवेत. घोडेबाजार टाळण्यासाठी पक्षांतर बंदी कायदा आणला गेला, बाहेर राजकीय पक्ष असतो. तसेच विधानसभेत हा विधिमंडळ पक्ष असतो त्यामुळे बाहेरच्या लोकांच मत तुम्ही विश्वासात घेणार नाही का ? जे आमदार पडले त्यांचे मत लक्षात घेणार नाही का ? असा सवालही अरविंद सावंत यांनी उपस्थित केला.