ठाकरे गट लोकसभेच्या 23 जागा लढवणार; ठाकरेंनी राहुल गांधींशी केली चर्चा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लोकसभेच्या जागा वाटपाविषयी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. यंदा लोकसभा निवडणुकीत ठाकरे गट महाराष्ट्रात 23 जागा लढवणार असल्याची माहिती संजय राऊतांकडून देण्यात आले आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांशी देखील चर्चा केल्याचे राऊतांनी सांगितले आहे.

लोकसभेच्या जागा वाटपाविषयी दिल्लीतील पत्रकारांशी बोलताना संजय राऊत आज म्हणाले की, “आमची चर्चा ही दिल्लीतील नेत्यांशीच होईल, राज्यातील नाही. महाराष्ट्रात काँग्रेसचा एकही नेता नाही, जो निर्णय घेऊ शकेल, जर नेता आहे तर त्याला निर्णयाचा अधिकार नाही. सातत्याने त्यांना दिल्लीला विचारावं लागतं. त्यापेक्षा आम्ही दिल्लीतील काँग्रेस नेत्यांशी चर्चा करु, आम्ही 23 जागा लढवणारच”

राहुल गांधींशी उद्धव यांच्याची चर्चा

त्याचबरोबर, “शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दिल्लीत गेले होते. त्यावेळी त्यांची काँग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी जागावाटपाबाबत चर्चा झाली. आम्ही सर्वांनी एकत्र बसून महाराष्ट्रातील राजकारण आणि जागावाटपाबाबत चर्चा केली आहे. त्या चर्चेत काय घडलं ते आम्हालाच माहिती आहे. जागा वाटपाची चर्चा महाराष्ट्रात नाही दिल्लीत होईल” अशी माहिती संजय राऊत यांनी यावेळी दिल.

दरम्यान, यंदा राज्यामध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गट असा सामना राहणार आहे. या दोन्ही गटांनी निवडणुकीत सत्ता स्थापन करण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. अशातच शिवसेनेतून शिंदे गट बाजूला पडल्यानंतर उद्धव ठाकरे गट लोकसभेच्या किती जागा लढवेल याबाबत चर्चा रंगली होती. मात्र आता ठाकरे गट लोकसभेच्या 23 जागा लढवणार असल्याची माहिती राऊत यांनी दिल्यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.