व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

सत्तासंघर्षावरील सुनावणी 27 सप्टेंबरला; धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची शिंदे गटाची मागणी कोर्टाने फेटाळली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील सत्तासंघर्षांवर आज घटनापीठासमोर सुनावणी पार पडली. न्यायमूर्ती धनंजय चंद्रगुड यांच्या अध्यक्षतेखाली ही सुनावणी घेण्यात आली. यावेळी दोन्ही बाजूच्या वकिलांच्या युक्तिवादानंतर घटनापीठाने 27 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी घेणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे सत्तासंघर्ष आणखी लांबला आहे.

यावेळी शिंदे गटाचे अॅड. नीरज कौल यांनी धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याची मागणी घटनापीठाकडे केली, तसेच आगामी निवडणूक डोळ्यासमोर असल्याने चिन्हांबाबत लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी केली मात्र 27 सप्टेंबर पर्यंत धनुष्यबाणा बाबत कोणताही निर्णय घेऊ नका असे आदेश घटनापीठाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे शिंदे गटाची विनंती कोर्टाने नाकारल्याचे स्पष्ट झालं आहे.

तसेच, पुढील सुनावणी २७ सप्टेंबरला होईल. २७ सप्टेंबरच्या सुनावणीत दोन्ही गटाने आणि निवडणूक आयोगाने तीन पानांपेक्षा कमी असलेला लेखी युक्तीवाद सादर करण्याचेही आदेश घटनापीठाने दिले आहेत. त्यामुळे कोर्ट त्यावर काय निर्णय देतं, याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.