Thane Police Recruitment 2024 | ठाणे पोलीस विभागाअंतर्गत मोठी भरती सुरु, तब्बल 686 पदांची होणार भरती

Thane Police Recruitment 2024
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Thane Police Recruitment 2024 | ठाणे पोलीस विभागाअंतर्गत आता मोठी पोलीस शिपाई पदाची भरती चाललेली आहे. त्यामुळे ठाणे विभागातील जे कोणी उमेदवार पोलीस भरतीची वाट पाहत होते. त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. यामध्ये पोलीस शिपाई पदाच्या 686 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. 5 मार्च 2024 पासून हे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्याचप्रमाणे 31 मार्च 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे आता तुम्ही लवकरात लवकर यासाठी अर्ज करून ठाणे पोलीस विभागात भरती (Thane Police Recruitment 2024) होऊ शकता. आता या भरतीबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

महत्त्वाची माहिती | Thane Police Recruitment 2024

  • पदाचे नाव – पोलीस शिपाई पोलीस आणि शिपाई चालक
  • पदसंख्या – 686 जागा
  • चालक 20 पदे, शिपाई 666 पदे
  • शैक्षणिक पात्रता– उमेदवार बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे
  • नोकरीचे ठिकाण – ठाणे
  • वयोमर्यादा
  • खुलावर्ग 18 ते 28 वर्ष
  • मागासवर्गीय 18 ते 33 वर्ष
  • अर्ज शुल्क
  • खुला वर्ग 450 रुपये
  • मागास प्रवर्ग 350 रुपये
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 5 मार्च 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2024

निवड प्रक्रिया

सगळ्यात आधी उमेदवाराची शारीरिक चाचणी केली जाईल. त्यानंतर त्याची लेखी परीक्षा घेतली जाईल. लेखी परीक्षेनंतर चरित्र प्रमाणपत्राची पडताळणी घेतली जाईल आणि त्यानंतर वैद्यकीय चाचणी केली जाईल. (Thane Police Recruitment 2024)

अर्ज कसा करावा

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • यासाठी तुम्हाला त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे
  • त्यानंतर संपूर्ण कागदपत्रांची प्रत अपलोड करायची आहे.
  • 31 मार्च 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • त्यामुळे त्या आधीच ही अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा