हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गणपती विसर्जनावेळी शिंदे गट आणि ठाकरे गटात दादर पोलीस ठाण्याच्या परिसरातच जोरदार राडा झाला होता. या राड्यात शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आल्यांनतर आपण गोळीबार केलाच नाही असा दावा सरवणकर यांनी केला होता. मात्र या प्रकरणी आता बॅलेस्टिक तज्ज्ञांचा अहवाल आला आहे. या अहवालांनुसार, सदा सरवरणकर यांच्याच बंदुकीतून गोळी सुटल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे सरवणकर यांच्या अडचणीत वाढण्याची शक्यता आहे.
गणपती विसर्जनावेळी सदा सरवणकर यांनी शिवसेना विभागप्रमुख महेश सावंत यांच्यासह शिवसैनिकांना पिस्तूलचा धाक दाखवून गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला होता. त्यानंतर सदा सरवणकर यांच्यासह समर्थकांवर गुन्हा दाखल झाला. त्यातच आता बॅलेस्टिक अहवालानुसार, घटनास्थळावरून जप्त केलेली काडतुसे आणि बंदुकीचे नमुने जुळले आहेत. त्यामुळे ती गोळी सदा सरवणकर यांच्याच बंदुकीतून सुटल्याचे स्पष्ट झाले आहेत. त्यामुळे सरवणकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात असून या प्रकरणात पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, सरवणकर यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका बसू शकतो.
बॅलेस्टिक तज्ज्ञांच्या अहवालानंतर सदा सरवणकर यांच्यावर काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणावर सरवणकर यांच्याकडून यांच्याकडून अजून तरी कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.