लोणावळा, मावळमधील पर्यटनावरील बंदी हटवली; निसर्गाचा घ्या मनसोक्त आनंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र | गेल्या आठवड्याभरापासून संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर चांगलाच वाढलेला होता. त्यामुळे अनेक नदी, नाले, धरणे सगळे ओसंडून वाहत होते. अशातच प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला होता. पावसाचा वेग वाढल्याने प्रशासनाने अनेक पर्यटन स्थळांवर बंदी आणलेली होती. खास करून लोणावळा आणि मावळ तालुक्यात अनेक पर्यटन स्थळ आहेत. त्या ठिकाणी अनेक पर्यटक नेहमीच जात असतात. परंतु आता पावसाचा वेग कमी झाल्याने लोणावळ्यामध्ये पर्यटनाचा अनुभव घेणाऱ्या पर्यटकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे आता लोणावळा आणि मावळ तालुक्यातील पर्यटन स्थळांवरील बंदी हटवण्यात आलेली आहे.

राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत होता. त्यामुळे लोणावळा मावळ तालुक्यातील अनेक पर्यटन स्थळांवर 25 जुलै पर्यंत आदेश जारी करण्यात आलेला होता. परंतु आता पावसाचा जोर कमी झाल्याने 27 जुलैला रात्री बारानंतर पुन्हा एकदा हे आदेश शिथिल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे इथून पुढे प्रशासनाच्या पुढच्या आदेशापर्यंत मावळ आणि लोणावळ्यातील पर्यटन स्थळ स्थळांवर कोणत्याही प्रकारची बंदी राहणार नाही.

मागील आठवड्यात पावसाचा वेग वाढल्याने अनेक धबधबे आणि धरणांमध्ये जास्त प्रमाणात पाणी आले होते. या आधी लोणावळ्यातील भुशी डॅममध्ये दुर्घटना झाली. त्या दुर्घटनेचा विचार करूनच प्रशासनाने अनेक पर्यटन स्थळांवर बंदी घातलेली होती. प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार 25 जुलै ते 29 जुलै दरम्यान लोणावळा आणि मावळ तालुक्यातील सर्व पर्यटन स्थळांवर बंदी घालण्यात आली होती. परंतु आता मावळ आणि तुळशीचे प्रांत अधिकारी सुरेंद्र नवले यांनी हे आदेश शिथिल केले असल्याचे सांगितलेले आहे.

त्यामुळे तुम्ही जर आता या आठवड्यामध्ये मावळ किंवा लोणावळ्याला भेट देण्याचा प्लॅन करत असाल, तर हा प्लॅन तुम्ही लवकरात लवकर करा. पाऊस कमी असल्यामुळे या ठिकाणीचे सगळे नियम शिथिल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही येथील पर्यटनाचा देखील आनंद घेऊ शकता.