Wednesday, February 8, 2023

महिला सरपंचाच्या अभिनंदनाचा बॅनर रात्रीत फाडला : पोलिस ठाण्यात तक्रार

- Advertisement -

कराड | घारेवाडी येथे मागील काही दिवसात नूतन सरपंच यांची नियुक्ती झाली आहे. डॉ. अतुल भोसले यांच्या गटाचा सरपंच प्रथमच घारेवाडी येथे झाला आहे. सोमवारी रात्री महिला सरपंच घारेवाडी यांचा अभिनंदनाचा बॅनर लावण्यात आला होता. विकासकामांचा एक बॅनर लावण्यात आला होता. रात्री बाराच्या दरम्यान हे दोन्ही बॅनर फाडून टाकले असल्याची घटना घडली आहे. याबाबत कराड तालुका पोलिसात तक्रार दाखल झाली आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, घारेवाडी येथे सरपंच पदाची फेर निवडणुक नुकतीच पार पडली. त्यात डाॅ. अतुल भोसले यांच्या भाजप गटाच्या सरपंच प्रथमच घारेवाडी येथे झाल्या आहेत. सरपंच निवडीचे शुभेच्छा फलक घारेवाडी जुने गावठाण येथे लावले होते. त्या सोबत मंजूर विकास कामाचे फलक लावले होते. अज्ञातांनी ते फाडल्याचे तेथील ग्रामस्थांनी सांगितले. रात्री घडलेला प्रकार सकाळी उघडकीस आला. तेथील ग्रामस्थांत त्या प्रकाराबद्दल उलट-सुलट चर्चा सुरू आहे.

- Advertisement -

एक महिला सरपंच अभिनंदाचे फलक फाडल्याने भाजप समर्थकातून संतप्त प्रतिक्रीया येत आहेत. संबधिताचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई व्हावी, असी मागणी तेथील महिला वर्गातून आता होत आहे. काका- बाबा गटाचे बहुमत असताना डाॅ. भोसले गटाचा सरपंच या ठिकाणी झाल्याने राजकीय वातावरण तापलेले आहे.