अभिमानास्पद! राज्य शासनाकडून ‘सर्वोत्कृष्ट विद्यापीठ’ पुरस्कार मुंबई विद्यापीठाला जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| यंदा राज्य शासनाकडून सर्वोत्कृष्ट विद्यापीठाचा पुरस्कार मुंबई विद्यापीठाला देण्यात आला आहे. नुकतेच राज्य शासनाने राष्ट्रीय सेवा योजनेचे पुरस्कार जाहीर केले आहेत. यामध्ये मुंबई विद्यापीठाने सर्वोत्कृष्ट विद्यापीठाचा मान मिळवला आहे. तर सर्वोत्कृष्ट कार्यक्रम समन्वयक म्हणून मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव सुधीर पुराणिक यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून मुंबई विद्यापीठाला 2021-22 या वर्षासाठी मिळाला आहे.

मुख्य म्हणजे, राष्ट्रीय सेवा योजनेकडून सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार आर. डी. नेशनल महाविद्यालयातील विजेंद्र शेखावत यांना प्रदान करण्यात आला आहे. यासोबत, सर्वोत्कृष्ट स्वयंसेवकाचा पुरस्कार विद्यार्थी ए. सेल्वा प्रकाश या विद्यार्थ्याला देण्यात आला आहे. या सर्व विजेत्यांचा प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम देऊन यथोचित सत्कार केला जाणार आहे. आता फक्त विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली आहे. यामध्ये सर्वोत्कृष्ट विद्यापीठाचा पुरस्कार मुंबई विद्यापीठाला मिळाले असे समोर आले आहे.

विद्यापीठाकडून वेगवेगळ्या कार्यक्रमांचे अजून

दरम्यान, मुंबई विद्यापीठाने सन 2021-22 या वर्षात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. याकाळात मुंबई विद्यापीठाने सुमारे २ कोटी रुपयाची पुरग्रस्ताना मदत केली. तसेच, विविध रक्तदान शिबिरांचे कार्यक्रम आयोजित करत 78,945 युनिट रक्त जमा केले. इतकेच नव्हे तर, लसीकरण शिबिरांचे आयोजन, वृक्षारोपण, पल्स पोलिओ लसीकरण मोहीम, पर्यावरण जनजागृती, बेटी बचाओ, महिला सशक्तीकरण, उद्योजकता विकास कार्यक्रम, मतदार जनजागृती, योगा कार्यक्रम यापेक्षा अधिक विविध कार्यक्रमांचे आयोजन मुंबई विद्यापीठाने केले. सध्या, मुंबई विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत 459 युनिट कार्यरत आहेत. तसेच, 41,500 स्वयंसेवक काम करत आहेत.