औरंगाबाद : शहरात लॉकडाऊन दरम्यान दुचाकी चोरीचे सत्र सुरूच आहे. गेल्या अनेक दिवसापासून शहरातून विविध भागातून दुचाकी चोरीला जात आहेत. पोलिसांनी कारवाई करून दुचाकी दोन-तीन दुचाकी चोरट्यांना ताब्यात देखील घेतले आहे. तरीसुद्धा शहरात दुचाकी चोरीचे सत्र कायम आहे.शहरात वेगवेगळ्या भागातून धुमाकुळ घालत वाहन चोरांनी विविध भागातून पाच दुचाकी लंपास केल्या आहेत.
अक्षय प्रेमचंद कासलीवाल ( वय३०) रा. बालाजीनगर यांनी ४ जून रोजी निरालाबाजारातील तापडीया सुपर मार्केट येथे दुचाकी (एमएच-२०-ईसी-००७९) उभी केली होती. त्यांची दुचाकी चोराने हँडल लॉक तोडून लांबवली. योगेश रघुनाथ चौधरी (वय ३८) रा.सिडको, एन-८ यांनी ३१ मे रोजी घरासमोर दुचाकी (एमएच-२०-एई-१५१३) उभी केली होती. त्यांची दुचाकी मध्यरात्री चोराने लांबवली.
भाग्यश्री प्रकाश अष्टेकर (वय २५) रा. भाग्योदयनगर, सातारा यांची दुचाकी (एमएच-२०-एफके-३९६५) २५ मे रोजी मध्यरात्री घरासमोरुन लांबवण्यात आली. यानंतर विक्रम पृथ्वीराजसिंह ठाकुर (वय ३७) रा. न्यु शांतीनिकेतन कॉलनी यांची दुचाकी (एमएच-३१-सीजे-६६६२) १ जून रोजी घराजवळून लांबविण्यात आली. तर नवनाथ आसाराम वाघ (वय ४६) रा. श्रध्दा कॉलनी, वाळुज यांची दुचाकी (एमएच-२०-सीई-२६०५) ४ जून रोजी चोराने लांबवली. याप्रकरणी संबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.