औरंगाबाद : गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह गोलटगाव शिवारात विहिरीत सापडल्याची धक्कादायक घटना समोर अली आहे. अजय अंबिलढगे ( २१, रा गोलटगाव ) असे मृत तरुणाचे नाव आहे. हि घटना समोर येताच गोलटगाव शिवत एकाच खळबळ उडाली. या प्रकरणी करमाड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात अली आहे.
या प्रकरणी सविस्तर माहिती अशी कि, अजय हा गुरवारी रात्री काही न सांगता घरातून निगुन गेला होता. त्यांनतर तो घरी ना आल्याने नातेवाईकांनी त्याचा शोध सुरु केला. अजयचा काहीच सुगावा न लागल्याने करमाड पोलीस ठाण्यात नातेवाईकांनी अजय बेपत्ता असल्याची तक्रार दिली.
दरम्यान, रविवारी गावाजवळील विहिरीत अजयचा मृतदेह गावकऱ्यांनी दिसला आणि त्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांच्या मदतीने त्याचा मृतदेह बहर काढण्यात आला.नंतर त्याला घाटी रुगणालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी अजयला तपासून मृत घोषित केलीय. हा प्रकार घातपात कि आत्महत्या अद्याप स्पष्ट झालेले नाही.