कराडमध्ये ‘द बर्निंग कार’चा थरार!! चालत्या गाडीने घेतला पेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । अक्षय पाटील
कराड शहरातील अत्यंत गजबजलेल्या अशा दत्त चौक परीसरात बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. चालत्या गाडीने अचानक पेट घेतल्याने काही काळासाठी नागरिकांची चांगलीच भंबेरी उडाली. बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

गुढीपाडव्या निमित्ताने कराड शहरात सर्वत्र नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली . यावेळी सांयकाळी 6 च्या दरम्यान, दत्त चौकामध्ये चालत्या कारने अचानक पेट घेतला. गाडीला आग लागल्याचे लक्षात येताच कार चालकाने तात्काळ गाडी थांबवून कारमधील सर्वजण खाली उतरवले. यावेळी नजीक असलेल्या व्यापार्‍यांनी कारवर पाणी मारून आग आटोक्यात आणली मात्र अचानक लागलेल्या या आगीमुळे वाहन चालकाची चांगलीच तारांबळ उडाली होती.

या थरारक घटनेनंतर पोलिसानी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. आणि पेटलेल्या कारला रस्त्याच्या बाजूला करत वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. गाडीला आग नेमकी कशी लागली याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. परंतु या बर्निंग कारच्या थराराची चर्चा शहरात वाऱ्यासारखी पसरली.