केंद्र सरकारचे ठोस पाऊल! दहशतवादाला पाठिंबा देत असलेल्या या संघटनेवर घातली बंदी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बुधवारी केंद्र सरकारने मुस्लिम लीग जम्मू-काश्मीर संघटनेवर बंदी घातली आहे. बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायदा(UAPA) अंतर्गत सरकारने संघटनेवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. ही संघटना दहशतवादी गटांना पाठिंबा देत होती तसेच, ती अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होती असे गंभीर आरोप केंद्र सरकारने लावले आहे. त्यामुळेच या संघटनेवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करत दिली आहे.

आपल्या ट्विटमध्ये अमित शहा यांनी म्हटले आहे की, ‘मुस्लिम लीग जम्मू काश्मीर संघटना UAPA अंतर्गत ‘बेकायदेशीर संघटना’ म्हणून घोषित करण्यात आली आहे. ही संघटना आणि तिचे सदस्य जम्मू आणि काश्मीरमध्ये देशविरोधी आणि फुटीरतावादी कारवायांमध्ये सहभागी आहेत. ते दहशतवादी कारवायांचे समर्थन करत आहेत. तसेच ते लोकांना जम्मू आणि काश्मीरमध्ये इस्लामिक राज्य स्थापन करण्यासाठी प्रवृत्त करत आहेत.

कोण आहे मसरत आलम?

मसरत आलम भट्ट गेल्या 4 वर्षांपासून दिल्लीच्या तिहार तुरुंगात कैद आहे. एनआयएने काश्मिरी कट्टरपंथी फुटीरतावादी गट ऑल पार्टी हुर्रियत कॉन्फरन्सचा अध्यक्ष मसरत आलम यांच्यावर दहशतवादी निधीसाठी गुन्हा दाखल केला आहे. याच आलमवर 27 गुन्हे दाखल आहेत.कट्टरपंथी सय्यद अली शाह यांच्या मृत्यूनंतर मसरत आलमला संघटनेचा अध्यक्ष बनवण्यात आले.