महाराष्ट्र-गुजरातला जोडणार धानोरा पूल कोसळला ; Video आला समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नंदुरबार : हॅलो महाराष्ट्र – सरकारच्या नेहमीच निकृष्ट दर्जाच्या कामामुळे राज्य महामार्गावरील पूल कोसळल्याच्या (bridge collapse) अनेक घटना बातम्या आपण वाचल्याच असतील. अशाच पद्धतीची एक घटना आज नंदुरबार जिल्ह्यात घडली आहे. महाराष्ट्र गुजरातला जोडणारा पूल (bridge collapse) आज सकाळी कोसळला. हा पूल रंका नदीत कोसळला. या पूलाला मध्यभागी तडा पडून हा पूल कोसळला. यामुळे या पुलावरील वाहतूक पूर्ण बंद करण्यात आली आहे.

सुदैवाने या घटनेत कोणतेही जीवितहानी झालेली नाही. नंदुरबार जिल्हा येथून गुजरात राज्याची सीमा केवळ 40 ते 50 किलोमीटर अंतरावर आहे. यामुळे येथील बहुतांश नागरी गुजरातला जाण्यासाठी राज्यमार्ग क्रमांक सहा असलेल्या नंदुरबार तालुक्यातील धानोरा मार्गे जातात. यामुळेच या मार्गावर नेहमीच वर्दळ असते. सुदैवाने पूल कोसळले (bridge collapse) त्यावेळी या रस्त्यावरून वाहन जात नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

पूल कोसळल्याचे कळताच (bridge collapse) आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी पूल पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!