रुग्णालयात अ‍ॅडमिट होण्यासाठी आता कोरोना रिपोर्टची गरज नाही; वाचा नवे नियम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली वृत्तसंस्था : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोविड रुग्णांच्या रुग्णालयात दाखल करण्याचे धोरण बदलले आहे.नवीन धोरणानुसार, कोविड विषाणूचा संसर्ग असलेल्या कोणत्याही व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यासाठी सकारात्मक प्रमाणपत्र आवश्यक नाही.पूर्वी, कोविडचा सकारात्मक अहवाल किंवा सीटी स्कॅन रुग्णालयात दाखल होण्यासाठी आवश्यक होते.covid-19 रुग्णाच्या लक्षणानुसार त्याला सीसीसी, डीसीएससी आणि डीएससी मध्ये भरती करण्यात येणार आहे.

काय आहेत नवे नियम

— संशयित कोणताही व्यक्ती रुग्णालयात ऍडमिट होऊ शकतो.
– रूग्णालयात दाखल होण्यासाठी कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रिपोर्टची गरज नाही
– कोणत्याही शहरातील कोणत्याही रुग्णाला ओळखपत्र नाही म्हणून रुग्णालयात ऍडमिट करण्यावाचून रोखता येत नाही.
– कोणत्याही रुग्णाला ऑक्सिजन आणि औषध घेण्यापासून वंचित ठेवता येणार नाही मग तो कुठल्याही शहरात राहणारा असो.
– रुग्णाची लक्षणे आणि गरज पाहूनच रुग्णालयात दाखल करून घेतले जाईल
– रुग्णालयात ऍडमिट करण्याची गरज नसतानाही रुग्णाने बेड अडवून ठेवले तर नाही ना हे पाहणे बंधनकारक आहे.
– येत्या तीन दिवसात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य विभागाने याची अंमलबजावणी करण्याचे निर्देशही आरोग्य विभागाने दिले आहेत.

देशातील कोरोनाची लेटेस्ट आकडेवारी

केवळ शहरातच नव्हे तर देशातील आणि राज्यांमधील खेड्यांमध्ये देखील कोरोनाचा संसर्ग हा वेगानं फोफावताना दिसत आहे. अनेक राज्यांनी आणि जिल्ह्यांनी कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र कोरोनारुग्ण वाढीचा दर काही कमी येताना दिसत नाही. देशात मागील 24 तासात 4,01,107 तर नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तर मागील 24 तासात आतापर्यंत सर्वाधिक रेकॉर्डब्रेक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मागील 24 तसच देशात चार हजार 187 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर मागील २४ तासात ३लाख १८ हजार ६०९ व्यक्ती कोरोनमुक्त झाले आहेत. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Leave a Comment