संकट टळलं नाही ! मुंबईसह उपनगरात पुढील काही तास पाऊस आणि वेगाने वारे वाहण्याचा अंदाज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: तौक्ते चक्रीवादळाने आता गुजरात कडे कूच केली असली तरीसुद्धा त्याचा परिणाम अजूनही मुंबई येथील किनारपट्टीवर होणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. अद्यापही हे संकट टळलेले नसल्याचे माहिती हवामान विभागातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे मुंबई आणि उपनगरात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील काही तासात कोसळण्याची शक्‍यता हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. त्याचबरोबर 80 ते 90 किलोमीटर प्रतितास वेगाने वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

मुंबईचा उपनगरामध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले. सोमवारी रात्रभर ठिकाणी पावसाने हजेरी लावल्यामुळे झाड कोसळले, वीजपुरवठा खंडित झाला तर दुसऱ्या दिवशीसुद्धा पावसाचा प्रभाव कायम राहणार आहे सांताक्रूझ-चेंबूर, मुलुंड, कुलाबा,सह संपूर्ण मुंबईत पावसाची शक्यता असल्याचा हवामानाचा अंदाज सकाळी 7 ते 10 पर्यंत आहे. मुंबई आणि उपनगरात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे वर्तवण्यात आला आहे.

मुंबईत तौक्ते चक्रीवादळामुळे व शहरात 104 उपनगरात 114 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात 50 ते 60 किलोमीटर वेगाने वर नोंदवला गेला तर कुलाबा येथे 144 किलोमीटर वाऱ्याच्या वेगाची नोंद, 26 ठिकाणी भिंत किंवा घराचा भाग पडला तर 479 ठिकाणी झाडे अथवा झाडांच्या फांद्या तुटण्याची नोंद झाली आहे. मढमध्ये जेट्टी बोट बुडाल्याने पाच जण समुद्रात पडले होते त्यापैकी चार जण सुखरूप तर एक जण बुडालयाची भीती व्यक्त करण्यात आली आहे. व एका व्यक्तीचा शोध सुरू आहे. तर हाजीअली जवळ 11 लहान बोटी बुडाल्याची माहिती समोर आली आहे.

 

Leave a Comment