मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली ! ‘या’ दिवशी होणार शिंदे-फडणवीस अन् पवार सरकारचा विस्तार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या वर्षभरापासून शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. त्याला आता मुहूर्त सापडला आहे. शिंदे गटातील आणि भाजपचे अनेक आमदार मंत्रिपदाकडे आस लावून बसले असताना अशातच आता राष्ट्रवादीचे 9 आमदार या महायुतीमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे शिंदे-फडणवीस ऐवजी आता शिंदे-फडणवीस आणि पवार सरकार असा उल्लेख केला जात आहे. या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार हा ९ किंवा १० जुलै रोजी केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत काल रात्री मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची नंदनवन या शासकीय निवासस्थानी बैठक झाली आहे. या बैठकीत अनेक मुद्यांसह उर्वरित आमदारांना मंत्रीपदे देण्याची व मंत्री मंडळ विस्ताराबाबत चर्चा करण्यात आली. पावसाळी अधिवेशनास १७ जुलै पासून सुरुवात होणार आहे. या अधिवेशाच्या तोंडावर मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना शपथ घेणाऱ्या मंत्र्यांसाठी मिळालेल्या संबधित खात्यांची माहिती असावी याअनुशंगाने आता हालचालींना वेग आलेला आहे.

अजित पवार यांच्या गटाने भाजप-शिंदे सरकारसोबत एकी केल्यानंतर पवार गटातील आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. मात्र, वर्ष होत आले तरी शिंदे-फडणवीस सरकारमधील उर्वरित आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली नसल्यामुळे त्यातून नाराजी व्यक्त केली जात होती. त्यावर तोडगा काढण्यासाठी आता उर्वरित मंत्रीमंडळाच्या विस्तारात भाजप व शिवसेनेच्याच आमदारांना शपथ दिली जाणार असल्याची चर्चा होत आहे.