जेवताना अस काही घडल की बापाने चिमुकलीचा आपटून केला खून…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

औरंगाबाद | जेवताना कायम रडते म्हणून सावत्र बापाने दीड वर्षीय मुलीचा जमिनीवर आपटून क्रूरपणे खून केला. ही धक्कादायक घटना बुधवारी रात्री भेंडाळा शिवारातील अंतापूर येथे घडली. त्यानंतर मयत मुलीच्या आईने रागाच्या भरात दिराच्या दोन वर्षे चिमुकलीला घेऊन पोबारा केला. तिच्या शोधार्थ पोलिसांचे एक पथक नेवासा तालुक्यात पाठवण्यात आले आहे. या घटनेमुळे गंगापूर तालुका हादरला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भेंडाळा येथील 15 वर्षीय मुलाने बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील मांडवा येथील अश्विनी भोसले (21) हिच्याशी दोन महिन्यापूर्वी गंधर्व विवाह केला होता. तिला पहिल्या पतीपासून तिला दीड वर्षाची मुलगी होती.मुलीला घेऊन ते दुसर्‍या पतीसह राहत होती. अल्पवयीन पती आणि पत्नी बुधवारी दुपारी भांडण झाले. त्यानंतर संतापलेल्या अल्पवयीन पतीने मुलीला बुधवारी सायंकाळी कडेवर नेऊन अंतापुर शिवारातील शेती महामंडळाच्या गट नंबर 171 मधील शेतात नेऊन तिचा गळा दाबून आपटून खून केला. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मुलीला जमिनीत गाढले.

नंतर घरच्यांनी मुलीबद्दल विचारपूस केली असता त्याने घडलेला प्रकार सांगितला. तेव्हा मयत मुलीच्या आईने रागाच्या भरात दिराच्या दोन वर्षीय रियाला उचलून नेले. गुरुवारी सकाळी झाल्यानंतर आरोपीने स्वतःहून पोलीस स्टेशनला जाऊन मी माझ्या मुलीचा खून केला असल्याची कबुली दिली.

त्यानंतर सावत्र वडीला विरुद्ध गंगापूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली. पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित, यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय लोहकरे करीत आहेत. दरम्यान अल्पवयीन बापाला बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.