हृदयद्रावक ! बापानेच ठेवले होते एक वर्षाच्या चिमुकलीला कोंडून; दामिनी पथकाने वाचवले चिमुकलीचे प्राण, पहा संपूर्ण व्हिडिओ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद । बापानेच आपल्या एक वर्षीय मुलीला गेल्या तीन दिवसांपासून भुकेले ठेऊन घरात कोंडून ठेवल्याची घटना आज सकाळी डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ येथे घडली. विद्यापीठातील एका इमारतीचे काम सुरु आहे. त्या ठिकाणी या चिमुकलीचा क्रूर पिता तुळशीराम भालेराव (वय 45 ) वाचमन म्हणून कामला होता. तो त्याच्या कुटुंब सोबत तिथे राहत असल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या का दोन महिन्या पूर्वी त्याचे आणि त्याच्या पत्नीचे भांडण झाले असल्याने त्याची बायको मुलीला तेथेच सोडून निघून गेली आहे. हा इसम नेहमी दारूच्या नशेत असतो आणि त्याच्या एक वर्षीय मुलीला नेहमी मारतो अशी माहिती स्थानिकांनी दिली.

या बाबद अधिक माहिती अशी, सकाळी त्याच इमारतीत रंग देणाऱ्या कामगाराला या मुलीचा रडण्याचा आवाज आला. त्याने त्या मुलाचा आवाज ऐकून मुलीकडे गेला . मुलीची अवस्था पाहून त्याने तिला पाणी पाजले आणि खायला दिले. त्यानंतर तात्काळ त्यांनी पोलिसांशी संपर्क केला. त्यावेळी बेगमपुरा पोलीस स्टेशनचे बीट मार्शल यांनी घटना स्थळी धाव घेतली. त्यांनी परिस्थिती पाहून दामिनी पथकाला बोलावले असता घटनस्थिती दामिनी पथकाच्या प्रियांका सरसंडे यांनी तात्काळ पाचारण केले. तो पर्यंत बेगमपुरा पोलीस स्टेशनचे बीटमार्शल यांनी त्या क्रूर पित्याला ताब्यात घेतले होते.

दामिनी पथकाने हॅलो महाराष्ट्र सोबत संवाद साधला असता त्यांनी सांगितले कि, आता या चिमुकल्या मुलीच्या पित्याला बेगमपुरा पोलीस स्टेशनने ताब्यात घेतले असून. या लहान मुलीची वैद्यकीय तपासणीसाठी घाटी रुगणालयत नेण्यात येणार आहे आणि पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

पहा संपूर्ण व्हिडिओ

 

https://www.facebook.com/aurangabadnewslive/videos/145939907557442/