धक्कादायक! वडिलांनी प्रियकराला हाताशी धरून मुलीचा काढला काटा; कारण वाटून बसेल धक्का

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | छत्तीसगढमध्ये एका वडिलांनी मुलीच्या प्रियकरासोबतच मिळून लेकीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आपली लेक गर्भवती असल्यामुळे समाजात होणाऱ्या बदनामीला भिवून वडिलांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची प्राथमिक माहिती पोलीसांनी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलीच्या वडिलांना आणि प्रियकरायला अटक केली आहे. या बातमीमुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, टिकली चौहान असे मृत्यु झालेल्या मुलीचे नाव आहे. तर रामरतन चौहान असे आरोपी वडिलांचे आणि वी.के सिंह यादव प्रियकराचे नाव आहे. गेल्या 28 जुलै रोजी टिकली घराच्या बाहेर काही कामानिमित्त पडली होती. मात्र थोड्या वेळानंतर तिचा मृतदेह घराच्या मागे आठवण आल्यामुळे गावात खळबळ माजली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी टिकलीचा खून झाला असल्याची माहिती दिली. तसेच या घटनेचा तपास करीत असताना पोलिसांनी टिकली चौहानच्या कुटुंबियांची चौकशी केली. तेव्हा सर्व सत्य उघडकीस आले. तसेच, मुलीच्या वडिलांची चौकशी केल्यानंतर त्यांनी आपण केलेल्या गुन्ह्याचे कबुली दिली. तसेच यामध्ये तिचा प्रियकर देखील सामील असल्याची माहिती पोलिसांना आरोपी वडिलांनी दिले. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मग टिकलीच्या प्रियकराला देखील ताब्यात घेतले.

यावेळी, टिकली नुकतीच गर्भवती राहिली होती. यामुळे तिचे वडील तिच्यावर प्रचंड नाराज होते. तसेच दुसऱ्या बाजूला टिकलीने प्रियकरासोबत लग्न करण्याचा अट्टाहास ठरला होता. मात्र आरोपी प्रियकराला तिच्यासोबत लग्न करायचे नव्हते. 28 जुलै रोजी टिकली घराच्या बाहेर पडल्यानंतर तिच्या मागे तिचे वडील देखील गेले. यानंतर त्यांनी ओढणीने गळा आवळत टिकलीची हत्या केली. यानंतर आरोपी प्रियकराने तिचा मृतदेह एका खड्ड्यात फेकून दिला. दरम्यान याप्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात कलम ३०२, आयपीसी ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच एका वडिलांनी आपल्या मुलीची हत्या केल्यामुळे या घटनेबाबत संताप व्यक्त केला जात आहे. यापूर्वी देखील समाजात बदनामी होऊ नये यासाठी कुटुंबानेच मुलींची हत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. आता तर वडिलांनी मुलीच्या प्रियकरासोबतच मिळून तिचा काटा काढल्याचे उघडकीस आले आहे.