‘जी भिती होती ती खरी ठरली’…रोहित पवारांच्या ‘त्या’ ट्वीट ची सर्वत्र चर्चा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशात कोरोनाची रुग्ण संख्या ही झपाट्याने वाढत आहे. अशातच देशातील काही राज्यांमध्ये निवडणुका पार पडल्या आणि त्यांचे निकालही लागले. निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर मात्र पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याची बाब आज मंगळवारी निदर्शनात आली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी २ मे रोजी एक ट्विट केलं होतं आणि ट्विटमध्ये या इंधन दरवाढीबाबत आधीच भाकित केलं होतं आता ते खरं ठरलं आहे. त्यामुळे रोहित पवार यांच्या त्या ट्वीटची चर्चा सर्वत्र होत आहे.

रोहित पवार यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हण्टले होते की, चार राज्यातील निवडणुका संपल्या आणि निकालही लागले. त्यामुळं आता पेट्रोल-डिझेलचे थांबलेले दर पुन्हा एकदा वाढू लागतात की काय आणि जनतेला आणखी महागाईच्या खाईत लोटतात की काय असं वाटू लागलंय!’ अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले होते.
त्यानंतर आता पुन्हा एकदा ‘जी भीती वाटत होती ती खरी ठरली’… अशा आशयाचे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.

Leave a Comment