जिल्ह्यातील पहिला CNG पंप कृष्णा कारखान्याचा सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना संचलित सी.एन.जी पंपाचे उद्‌घाटन चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते करण्यात झाले. सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेला हा जिल्ह्यातील पहिलाच सी.एन.जी. पंप असून, या पंपामुळे परिसरातील लोकांची मोठी सोय होणार आहे.

कार्यक्रमाला व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक लिंबाजी पाटील, जितेंद्र पाटील, धोंडीराम जाधव, बाबासो शिंदे, बाजीराव निकम, शिवाजी पाटील, दत्तात्रय देसाई, जे. डी. मोरे, विलास भंडारे, अविनाश खरात, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, मनोज पाटील, वैभव जाखले, संजय पवार, सेक्रेटरी मुकेश पवार, टेक्निकल को-ऑर्डिनेटर एस. डी. कुलकर्णी, स्टोअर ऑफिसर गोविंद मोहिते, प्राचार्य डॉ. भास्करराव जाधव, सी.एन.जी. तंत्रज्ञ अक्षय यादव आदी उपस्थित होते.

डॉ. सुरेश भोसले म्हणाले, देशात नैसर्गिक वायू इंधन देण्याचे नियोजित करण्यात आले असून, त्याअंतर्गत प्रदूषण कमी करण्याचा केंद्र शासनाचा मानस आहे. यासाठी देशभरात विविध ठिकाणी इंधनासाठी नैसर्गिक वायूचा वापर केला जाणार आहे. या भूमिकेतून कृष्णा कारखान्याने सी.एन.जी. पंप कार्यान्वित केला असून, लोकांना याचा निश्चितपणे फायदा होणार आहे. ऊस शेती हा ऊर्जेचा निरंतर स्तोत्र आहे. लोकांना लागणारी ऊर्जा आता आपण ऊसशेतीच्या माध्यमातून निर्माण करत आहोत. सोलर एनर्जीचाही वापर वाढविला पाहिजे. येत्या काळात इथेनॉल निर्मितीमध्ये वाढ करण्यात येणार असल्याचे डॉ. भोसले यांनी सांगितले. मुकेश पवार यांनी सूत्रसंचालन केले. संचालक जितेंद्र पाटील यांनी आभार मानले.