सेल्फीचा नाद अंगलट आला; युवती थेट दरीत कोसळली, पण पुढे जे झालं ते…

selfi girl fell into valley
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोबाईल वरून सेल्फी (Selfie) काढणं हा आजकाल छंदच झाला आहे. कुठेही बाहेर गेलं तरी कोणत्या तरी एका स्पॉट वरून स्वतःचा सेल्फी काढण्यात आजकालच्या तरुणाईला खूपच मोठा आनंद मिळतो, कधी पाण्याच्या प्रवाहाजवळ उभा राहून सेल्फी काढला जातो, तर कधी डोंगर दऱ्यांमध्ये सेल्फी काढली जाते. मात्र हे करत असताना आसपासच्या परिस्थितीचे भान सुद्धा त्यांना नसते. अशीच एक घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे. एका युवतीने डोंगराच्या किनाऱ्यावर सेल्फी काढण्याचे धाडस केले अन् ती शंभर फूट खोल दरीत कोसळली. मात्र तिचं दैव बलवत्तर म्हणून ती वाचली.

नेमकं काय घडलं?

सदर तरुणीचे नाव नसरीन अमीर कुरेशी (वय २९) असं आहे. ती पुण्यातील वारजे येथील असून पर्यटनासाठी तिच्या मित्रांसोबत साताऱ्यातील संगमनगरमध्ये आली होती. त्याचवेळी ठोसेघर रस्त्याला बोरणे घाटात आल्यावर सर्वजण गाडीतून उतरुन फोटोसेशन करु लागले. पण सेल्फी काढण्याच्या नादात नसरीनचा पाय घसरला आणि ती १५० फूट खोल दरीत कोसळली. या तरुणीचं आयुष्य संपलं असचं अनेकांना वाटलं. मात्र तीच नशीब बलवत्तर म्हणून ती दरीत कोसळत असताना एका झाडाला अडकली आणि खाली पडण्यापासून वाचली.

यानंतर तिच्या मित्रांनी ही माहिती सातारा पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्सच्या युवकांना बोलवले. या ट्रेकर्सनी जीवाची बाजी लावत नसरीनचे प्राण वाचवले. या घटनेत नसरीन कुरेशी गंभीर जखमी झाली आहे. यानंतर तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आहे. मात्र नशीब चांगलं म्हणूनच ती वाचली अशी भावना आता व्यक्त होत आहे.