मृत्यूच्या दारातील मुलगी म्हणाली ” खासदार साहेब थांबवा हे सगळं”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
फलटण मधील दोन मित्रांचा वाद मोठ्या प्रमाणावर चिघळला आहे. यामध्ये खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर आणि त्यांचे जिवलग मित्र दिगंबर आगवणे यांच्यातील वाद आता संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे. काही आर्थिक देवाण घेवाणीतून दोघांतील मैत्री संपुष्टात येऊन वैर निर्माण झाले आहे. यामध्ये दिगंबर आगवणे हे गुन्ह्यात शिक्षा भोगत आहेत. यामुळे आगवणेच्या कुटुंबावर संकट कोसळले असून मुलींने ‘आता तरी खासदार साहेब सगळं थांबवा’ आणि आमच्या कुटुंबाला त्रास देऊ नका अशी विनंती केली आहे.

दिगंबर आगवणे यांनी स्वतःच जीवन संपवायचा प्रयत्न केला होता. त्यानंतर कुटुंबावर येणारी अडचणी वडिलांना होणारा त्रास यामुळे दिगंबर आगवणे यांच्या मुलींनी सुद्धा आपला जीव संपवायचा प्रयत्न केला. तिला तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. आगवणेंच्या मुलीने एक व्हिडिओच्या माध्यमातून खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांना विनंती केली आहे.

दिगंबर आगवणे यांच्या मुलीच्या व्हायरल झालेल्या व्हिडिअोत मुलगी हाॅस्पीटलमध्ये असल्याचे दिसत आहे. तिला आॅक्सिजन लावण्यात आला आहे. तिच्याकडून भावनिक आवाहन खासदारांना केले जात आहे. यामध्ये तिने आजपर्यंत त्याच्यासोबत असलेल्या लोकांनी साथ सोडलेली असून कोणीही मदत करत नसल्याचे म्हटले आहे.