आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणीचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात यावे; कोणी केली मागणी?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सोमवारी शिवसेनेच्या अपात्र आमदार प्रकरणाची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यापुढे होणार आहे. या पार्श्वभूमीवर सुनावणीचे ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपण करण्यात यावे अशी मागणी काँग्रेसचे नेते विजय वडट्टेवार यांनी केली आहे. यासाठी वडेट्टीवार यांनी विधानसभा अध्यक्षांना एक पत्र देखील लिहिले आहे. या पत्राद्वारेच त्यांनी सुनावणीचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात यावे अशी मागणी केली आहे. याबाबतची माहिती स्वतः वडट्टेवार यांनी एका पोस्टच्या माध्यमातून दिली आहे.

सुनावणीचे लाईव्ह प्रक्षेपण करावे

लाईव्ह प्रक्षेपणासंदर्भात वडट्टेवार यांनी म्हणले आहे की, “लोकशाही व न्यायप्रिय महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष सुनावणीकडे आहे . संवैधानिक संस्था, संवैधानिक पदे आणि एकंदरीत लोकशाही व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीचे लाईव्ह प्रक्षेपण करावे ही मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केलेली आहे. आशा करतो की ते ही मागणी मान्य करतील.”

त्याचबरोबर, “शिवसेनेतील अपात्र आमदार प्रकरणाची सुनावणी ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे महाराष्ट्राच्या जनतेपुढे करण्यात यावी. राज्याच्या इतिहासातील मोठ्या राजकीय बंडखोरी प्रकरणातील आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण हे विधानसभा अध्यक्षांकडे प्रलंबित आहे.” असे देखील विजय वडट्टेवार यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष ही मागणी मान्य करून सुनावणीचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यासाठी परवानगी देतील का हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. तसे झाल्यास महाराष्ट्रातील जनतेला आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी पाहता येईल.

दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आमदार अपात्रे प्रकरणी एक आठवड्यांच्या आज सुनावणी घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. या आदेशानंतरच राहून नार्वेकर यांच्या सुनावणीच्या कामाला वेग आल्याचे दिसत आहे. आता येत्या सोमवारी राहुल नार्वेकर या प्रकरणाची सुनावणी घेणार आहेत. यापूर्वी झालेल्या सुनावणीत नार्वेकर यांनी दोन्ही गटाला कागदपत्रे सादर करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली होती. परंतु आता ही सुनावणी 25 सप्टेंबर रोजी होत आहे.