हायकोर्टाचा रोहित पवारांना दिलासा!! बारामती ॲग्रोवरील कारवाई 6 ऑक्टोबरपर्यंत टळली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर शुक्रवारी प्रदूषण मंडळाने कारवाई केली आहे. या ॲग्रो कंपनीचे येत्या 72 तासांत प्लांट बंद करा, अशी नोटीस प्रदूषण मंडळांने दिली होती. मात्र आता या कारवाईवर हायकोर्टाने रोहित पवारांना दिलासा दिला आहे. हायकोर्टाने येत्या 6 ऑक्टोंबर पर्यंत बारामती ॲग्रो कंपनीवर कारवाई न करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाला दिले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 6 ऑक्टोबरला पार पडणार आहे.

प्रदूषण मंडळाने रोहित पवार यांना 72 तासांत ॲग्रो कंपनीचे प्लांट बंद करा अशी नोटीस रात्रीच्या दोन वाजता दिली होती. त्यामुळे रोहित पवार मोठ्या अडचणीत सापडले होते. मात्र आता याप्रकरणी हायकोर्टाकडून रोहित पवारांना दिलासा मिळाला आहे. आता पुढील 6 ऑक्टोबरपर्यंत ऍग्रो कंपनीवर कारवाई न करण्याचे आदेश हायकोर्टाकडून देण्यात आले आहेत. या आदेशांमुळे रोहित पवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान आता ऍग्रो कंपनीची पुढील सुनावणी ही 6 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

मुख्य म्हणजे, ऍग्रो कंपनीवर कारवाई करण्यामागे विरोधकांचा हात असल्याची टीका रोहित पवार यांच्याकडून करण्यात आली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील या प्रकरणाविषयी विचारण्यात आले होते. मात्र यावेळी त्यांनी, या प्रकरणावर मी काहीच उत्तर देणार नाही अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आता रोहित पवारांना हायकोर्टाकडून दिलासा मिळाल्याची बातमी समोर आली आहे.