सहा दिवसांपूर्वी काँग्रेसचा हात धरलेल्या ‘या’ नेत्याचा आता राष्ट्रवादीत प्रवेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आगामी नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना ,काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी महाविकास आघाडी स्थापन केली असली तरी आघाडीत बिघाडी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अगदी सात दिवसांपूर्वीच नामदेव भगत यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यापूर्वी ते शिवसेनेत होते. आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी भवन मुंबई येथे हा पक्षप्रवेश संपन्न झाला.

दरम्यान भगत हे माजी नगरसेवक आहेत. आगरी समाजात त्यांचा प्रभाव आहे त्यांची राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भगत यांनी काँग्रेसची नवी मुंबईतीलजिल्हाअध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर ते शिवसेनेत गेले तिथे त्यांना सिडको वर काम करायला मिळेल अशी अपेक्षा होती मात्र तिचं काहीच संधी न मिळाल्याने त्यांनी अखेरीस सात दिवसांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हा त्यांना सिडकोचा देण्याचे आश्वासन देण्यात आले मात्र त्यांच्या पक्षप्रवेशवरुन नवी मुंबई कॉंग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली. थेट नाना पटोले यांच्या विरोधात तक्रार करण्याचा इशारा देण्यात आला त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीची वाट धरली. तिथे त्यांचे मोठ्या नेत्यांनी स्वागत केले.

दरम्यान नामदेव भगत यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट केले आहे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘नवी मुंबईतील काँग्रेस नेते श्री नामदेव भगत यांनी आपल्या साकाऱ्यांसह पक्षात प्रवेश केला. त्यांचे मनःपूर्वक स्वागत. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील त्यांची कार्यशीलता नक्कीच पक्षाच्या कामी येईल असा मला ठाम विश्वास आहे’ अशा आशयाचे ट्विट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

Leave a Comment